Homeकरियरsquad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

नांदेड| दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.  या दिवशी देखिल जिल्हयातील 109 केंद्रांवर बैठे पथका मार्फत झूम वेबकास्टद्वारे पुर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले होते.

आजच्या पेपरला उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विदयालय, येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त बैठे पथक प्रमुख व सदस्य गैरहजर असल्यामूळे त्यांना निलंबीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संबंधित विभागांना दिले. यामध्ये बैठे पथक प्रमुख विस्तार अधिकारी कृषी नरहरी मुंजाळ, बैठे पथक सदस्य केंद्रप्रमुख मोहन भोसले, ग्राम महसूल अधिकारी पांडूरंग गुब्रे हे बैठै पथकातील सदस्य परीक्षेच्या केंद्रावर गैरहजर होते. तसेच त्यांनी कोणतीही पुर्वसूचना दिली नाही. यामुळे संबंधितांना परीक्षा कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कर्तव्यात कसूर केल्याने सेवेतून निलंबीत करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना निर्देश जिल्हाधिकारी कर्डीले यांनी दिले आहेत.

आजच्या सकाळच्या रसायनशास्त्र पेपरला एकुण 24406 परीक्षार्थ्यांपैकी 24073 परीक्षार्थी उपस्थित होते.  याप्रमाणे उपस्थितीची टक्केवारी 98.64 होती. तर दुपारच्या राज्यशास्त्र पेपरसाठी एकुण 13207 परीक्षार्थ्यांपैकी 12594 उपस्थित होते. याप्रमाणे दुपारच्या पेपरला उपस्थितीची टक्केवारी 95.36 होती.

प्रत्येक केंद्रांवर बैठे पथकामार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेराद्वारे पुर्णवेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे स्व.संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा दहेली तांडा ता.किनवट येथील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी गैरप्रकार करतांना आढळून आल्यामुळे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी त्याचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला. तसेच सदर केंद्रावर मंडळाच्या निर्देशाप्रमाणे तसेच कॉपीमुक्त अभियानाचा भाग म्हणून उर्वरीत प्रश्नपत्रिका सीसीटीवीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या नाहीत, परीक्षार्थ्यांना व्यवस्थित तपासून सोडले नाही, अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला नाही यास संबंधित केंद्रसंचालक श्री गुटटे यांना जबाबदार धरून त्यांना निलंबीत करण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनास निर्देश दिले आहेत. 

स्व.संगिता देवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा ता.किनवट येथील मूळ मुख्याध्यापक  पांडूरंग आडे यांनी सदर केंद्र परिसरात आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिले नसल्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे संबंधितांना सेवेतून निलंबीत करण्यासाठी संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांना कळविले आहे.

तसेच संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविदयालय, पेठवडज ता.कंधार येथील परीक्षा केंद्रावर दोन विदयार्थी गैरप्रकार करतांना आढळून आल्यामुळे उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी त्यांचेविरुध्द मंडळ नियमाप्रमाणे कारवाई करुन तसा अहवाल मंडळाकडे पाठविला आहे. तसेच संबंधित दहेली तांडा व पेठवडज येथील केंद्रसंचालकांना तडकाफडकी बदलून इतर केंद्रसंचालकांची त्यांचे जागेवर नियुक्ती केली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments