Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

NNL Team
1 Min Read

नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सुचनेनुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे दुसऱ्या दिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. 

यावेळी शाहिर प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे प्रस्तुत “शिवगौरव-लोककला पर्व” कार्यक्रमात किर्तन, गोंधळ, पोवाडा’, शौर्यगीत, धनगरी लोकगीत, असा बहारदार अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककला प्रकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला. 

या सांस्कृतिक कार्यक्रमात इंजि. ह.भ.प. प्रविण जाधव पिंपळदरीकर महाराज व त्यांचा संचाने किर्तन तर ऋषी माटालकर व त्यांचा संच यांनी पोवाडा सादर केला. संदिप गोंधळी व त्यांचा संचाने गोंधळ सादर केले. लोकगीतामध्ये धनगरी लोकगीत साजरे केले. शिवनेरीवर शिवबा जन्मला हे शौर्यगीत प्रशांत चित्ते यांनी सादर केले.

या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी, नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी उपस्थित  होते. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रभावी दर्शन घडविणारा हा कार्यक्रम आज सादर करण्यात आला. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी, नागरिक, मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!