squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित
नांदेड| दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हयातील 109 केंद्रांवर बैठे पथका मार्फत झूम वेबकास्टद्वारे पुर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले होते.
आजच्या पेपरला उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विदयालय, येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त बैठे पथक प्रमुख व सदस्य गैरहजर असल्यामूळे त्यांना निलंबीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संबंधित विभागांना दिले. यामध्ये बैठे पथक प्रमुख विस्तार अधिकारी कृषी नरहरी मुंजाळ, बैठे पथक सदस्य केंद्रप्रमुख मोहन भोसले, ग्राम महसूल अधिकारी पांडूरंग गुब्रे हे बैठै पथकातील सदस्य परीक्षेच्या केंद्रावर गैरहजर होते. तसेच त्यांनी कोणतीही पुर्वसूचना दिली नाही. यामुळे संबंधितांना परीक्षा कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कर्तव्यात कसूर केल्याने सेवेतून निलंबीत करण्यासाठी संबंधित ...
