Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षा–२०२६चे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी ही परीक्षा होणार असून, आर.एन.एस. इंटरनॅशनल स्कूल, राजा भगिरथ शाळेचे मैदान, हिमायतनगर येथे स्पर्धा रंगणार आहे. कनिष्ठ गट (इ.३री ते ७वी) आणि वरिष्ठ गट (इ.८वी ते १०वी) अशा दोन गटांत ही परीक्षा होणार आहे. दोन्ही गटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या पाच क्रमांकांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे असल्याने स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासह बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी असून, अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. नावनोंदणीसाठी ३० रुपयांचे नाममात्र शुल्क ठेव...
Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

करियर, देश विदेश, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत इस्रायलमध्ये नुतनीकरणा अंतर्गत कामासाठी कौशल्यपूर्ण भारतीय उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या निवड प्रक्रियेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, लाभ याबाबतची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे. किमान अनुभव :- ३ वर्षे (Renovation Interior Work मध्ये कौशल्य आवश्यक). शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावा. वयमर्यादा २५ ते ५० वर्षे. इंग्रजी ज्ञान वाचन, लेखन आणि बोलणे यामध्ये प्राविण्य. पूर्व अनुभव इस्त्रायलमध्ये पूर्वी नोकरी नसावी. गुन्हेगारी रेकॉर्ड भारतातून स्वच्छ PCC आवश्यक, व्यसन मुक्त इतिहास. आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्यासक्षम मोठे...
Collector Visit : माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

Collector Visit : माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय, अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट

नांदेड, करियर
नांदेड| इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची अपुरी व्यवस्था असल्याचेही आढळले. ही बाब गंभीर मानून संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. तसेच संबंधित परीक्षा ...
Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली. मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांतून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मंदिर कमेटी...
Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड l हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. शाहिर सुभाष गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी गायनकलेच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, दलित समाजजागृती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सातत्याने पुढे नेत आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. या ...
A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

नांदेड, करियर
लोहा | पारडी येथील सह्याद्री शाळेच्या माळरानावरील निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेला ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. थंडीचा गारवा, रात्री पेटलेली शेकोटी आणि उत्साहाने सादर झालेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला. मेळाव्यात जिल्ह्यातील २५ शाळांतील विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत Bharat Scouts and Guides अंतर्गत ४० शाळांतील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शोभायात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक हरि...
Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर

Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर

करियर, नांदेड
लोहा|  स्काऊट-गाईड चळवळीतून विद्यार्थ्यांना शिस्त, स्वावलंबन व सहकार्य ही मूलभूत जीवनमूल्ये मिळतात. आजच्या काळात ही मूल्ये अधिक बळकट होण्याची गरज असून अधिक शाळा व अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढायला हवा, असे मत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. लोहा-पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळा मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय ५१ व्या स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात पार पडले. या मेळाव्यात ५१ शाळांचे ६० तंबू उभारण्यात आले असून जवळपास दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा नगराध्यक्ष शरद पाटील पवार होते. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, राज्य प्रदेश सचिव अँड मुक्तेश्वर धोंडगे, युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब त...
Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार

Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार

करियर, नांदेड
हदगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हरडफ येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंद नगरी’ उपक्रम उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून व्यावसायिक कौशल्यांचे धडे आत्मसात केले. ‘आनंद नगरी’ अंतर्गत शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध लघुउद्योगांचे स्टॉल उभारले. खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, शालेय साहित्य तसेच इतर उपयुक्त वस्तूंची विक्री करताना त्यांनी ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार करणे, खर्च व नफा-तोट्याचा हिशोब मांडणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण झाली. “भविष्यात नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वास या उपक्रमातून मिळाला,” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्य...
Collector Rahul Kardile : बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Collector Rahul Kardile : बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्रात वाचन संस्कृती न रुजण्याची अनेक कारणे सांगितली जातात. यावर अनेकांनी आकलन केले असून असे दिसून येते की आपण प्रमाणभाषा जास्त फोकस केली आहे. कोणत्याही भाषेचा मेन गाभा त्या भाषेतील लवचिकता, साधेपणा, सौंदर्य आहे. भाषेचा लिंग्विस्टिक न्यूनगंड विकसित होता कामा नये. अलीकडे भाषेमधून लवचिकता, साधेपणा कमी होत चालला आहे आणि बोलीभाषा फोकस न केल्याने वाचन संस्कृती रुजत नसल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केले. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान द्वारा ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत नररहर कुरुंदकर यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त वाचन: साद आणि प्रतिसाद विषयावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी अनौपचारिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन सायन्स महाविद्यालयाच्या पुरणमल लाहोटी सभागृहात करण्यात आले होते. व्यासपीठावर संवादक डॉ. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती. य...
Scout-Guide Meet : पारडी येथील सह्याद्री शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा

Scout-Guide Meet : पारडी येथील सह्याद्री शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा

करियर, नांदेड
• जिल्ह्यातील ५५ शाळांतील २ ते अडीच हजार कब–बुलबुल, स्काऊट–गाईड सहभागी• १५ वर्षांनंतर लोहा तालुक्यात जिल्हास्तरीय मेळावा• आयोजनासाठी १२ विविध समित्यांची स्थापना लोहा| लोहा शहराजवळील पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय कब–बुलबुल, स्काऊट–गाईड मेळावा दिनांक १२ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील जवळपास ५५ शाळांमधील दोन ते अडीच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी पहिली शेकोटी आयोजित करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी दुसरी शेकोटी, तर १५ फेब्रुवारी रोजी लोहा शहरातून भव्य शोभायात्रा काढून मेळाव्याचा समारोप करण्यात येणार आहे. तब्बल १५ वर्षांनंतर लोहा तालुक्यात जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये उत...
error: Content is protected !!