Wednesday, May 20

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Mudkhed news : डोंगरगावचे भूमिपुत्र ओमकार देवीसिंह ठाकूर यांची दैनिक महासागर समाचारच्या मुदखेड तालुका प्रतिनिधीपदी निवड

Mudkhed news : डोंगरगावचे भूमिपुत्र ओमकार देवीसिंह ठाकूर यांची दैनिक महासागर समाचारच्या मुदखेड तालुका प्रतिनिधीपदी निवड

करियर, नांदेड
मुदखेड | डोंगरगाव येथील भूमिपुत्र, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले ओमकार देवीसिंह ठाकूर यांची दैनिक महासागर समाचार या नामांकित वृत्तपत्राच्या मुदखेड तालुका प्रतिनिधीपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे डोंगरगावसह संपूर्ण मुदखेड तालुक्यात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमकार ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे, तळागाळातील जनतेच्या समस्या, विकासकामांची सद्यस्थिती, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच सामाजिक उपक्रमांचे वस्तुनिष्ठ वार्तांकन — या माध्यमातून त्यांनी एक विश्वासार्ह पत्रकार म्हणून आपली ठाम ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत दैनिक महासागर समाचारच्या संपादक मंडळाने त्यांची मुदखेड तालु...
Republic Day : श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day : श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, करियर
हदगाव, गौतम वाठोरे| तामसा रोडवरील श्री. साईबाबा निवासी अपंग विद्यालयात २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या उपा. वंदनाबाई सदाशिव वाठोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला. या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जगदीश बियानी, राकेश दमकोंडवार, गोटूशेठ लाहोटी, शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. पाळेकर, तसेच डाके सर, वाघमारे सर, वाट्टमवार सर, धडेवार सर, तावडे सर, अधीक्षक भूषण नरवाडे, मुधोळ सर, राठोड सर, गुंडेवाड सर, नल्लामडगे सर, येरेवाड मॅडम, गोवंदे मॅडम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
Medha Patkar : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

Medha Patkar : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

नांदेड, करियर
नांदेड,अनिल मादसवार| शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने वाढत असताना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून समाजमन घडविण्याचे सुरू असलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मागील वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समारोप शनिवार, दि. २४ रोजी भव्य कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाला मेधा पाटकर, पुणे येथील आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदेड ...
girls new Elgar Rally : बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जवळ्यात रॅली; सेव्ह द गर्लचा बुलंद नारा

girls new Elgar Rally : बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जवळ्यात रॅली; सेव्ह द गर्लचा बुलंद नारा

करियर, नांदेड
नांदेड | “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा!” या संदेशासह जवळा देशमुख येथील बालिकांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गावभर रॅली काढून समाजाला जागं केलं. हातात घोषणाफलक, ओठांवर ठाम घोषणा आणि डोळ्यांत आत्मविश्वास घेऊन या चिमुकल्या बालिकांनी अन्यायाविरोधात आणि समानतेसाठी ‘नवा एल्गार’ पुकारला. भारतामध्ये दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. मुलींना शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि समान अधिकार मिळावेत, तसेच समाजातील लैंगिक भेदभाव नष्ट व्हावा, या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. या निमित्ताने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व इयत्तांच्या मुलींनी रॅलीत सहभाग घेतला. “सेव्ह द गर्ल”, “मुलगा–मुलगी समान”, “शिक्षण हाच खरा दागिना”, “स्त्री भ्रूणहत्या बंद करा” अशा ठळक घोषणा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. जिल्ह्यात ३ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘लेक वाचवा – लेक श...
Sharad Deshpande : दृष्टी नव्हे, दृष्टीकोन महत्त्वाचा! दिव्यांगांच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा निर्धार – शरद देशपांडे

Sharad Deshpande : दृष्टी नव्हे, दृष्टीकोन महत्त्वाचा! दिव्यांगांच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा निर्धार – शरद देशपांडे

करियर, नांदेड
नांदेड | दिव्यांगता ही मर्यादा नसून ती समाजाच्या दृष्टिकोनाची कसोटी आहे. योग्य संधी, सकारात्मकता आणि ठाम पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्तीही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी भरारी घेऊ शकतात, असा ठाम विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी व्यक्त केला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील सायन्स कॉलेज मैदानावर या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. क्रीडाज्योत प्रज्वलन करून स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली. या वेळी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, निय...
Chief ministers my school : ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यात तालुकास्तरीय तपासणी सुरू

Chief ministers my school : ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यात तालुकास्तरीय तपासणी सुरू

करियर, नांदेड
लोहा/नांदेड| ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत लोहा तालुक्यातील शासकीय व खाजगी अशा एकूण २६ शाळांची तालुकास्तरीय तपासणी व मूल्यांकन प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ही तपासणी गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या स्वतंत्र पथकांमार्फत केली जात आहे. लोहा तालुक्यातील १३ केंद्रांमधून केंद्रस्तरावर पात्र ठरलेल्या शाळांची तालुका पातळीवर तपासणी केली जात असून, यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १३ व खाजगी व्यवस्थापनाच्या १३ अशा एकूण २६ शाळा ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी आहेत. मंगळवारी (दि. २० जानेवारी) लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय व शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या दोन खाजगी शाळांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात आली. ही तपासणी शिक...
Old Memories : ४९ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा; टिकोना फार्म, मुळशी येथे भावनिक भेट

Old Memories : ४९ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा; टिकोना फार्म, मुळशी येथे भावनिक भेट

नांदेड, करियर, मराठवाडा
नांदेड | पीपल्स हायस्कूल, नांदेड येथील १९७७ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे आठवे स्नेहमिलन सोहळा शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी टिकोना फार्म, मुळशी (पुणे) येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ४९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी या स्नेहमिलनात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे धागे अधिक घट्ट केले. या स्नेहमिलनास ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यापूर्वी या बॅचचे तीन स्नेहमिलन नांदेड, तीन पुणे, एक नाशिक व एक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले असून, यंदाचे हे आठवे स्नेहमिलन विशेष संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमात अनिल महामुनी, अरुणा महामुनी, श्रीकांत अकोलकर, शशिकांत गोहेल, अनिल अमृतवार, गंगामणी अमृतवार, व्यंकटेश कवटेकवार, बालाजी गिरी, अविनाश जोशी, प्रमोद व ज्योत्सना डुब्बेवार, श्रीकांत व सुनीता मांगुळकर, चंद्रकांत व सुजाता ...
School Teachers : मंगरूळच्या जिल्हा परिषद शाळेत तातडीने २ शिक्षकांची नेमणूक करा

School Teachers : मंगरूळच्या जिल्हा परिषद शाळेत तातडीने २ शिक्षकांची नेमणूक करा

करियर, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असून, याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. एकूण १२५ विद्यार्थी असताना, सध्या केवळ ४ शिक्षकांवर सात वर्गांचा भार आहे. त्यामुळे सर्व वर्गांना आवश्यक वेळ देणे अशक्य होत असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे. काही पालक शिक्षकअभावी शाळेत शिक्षणाचा दर्जा खालावल्याने मुलांना शाळेत न पाठवता थेट शेतकामासाठी सोबत नेत असल्याचे चित्र आहे. परिणामी शाळागळतीचे प्रमाण वाढत असून, भविष्यात साक्षरतेचे प्रमाण घटण्याचा धोका निर्माण झाला आहे, जी बाब ...
Recruitment postal insurance : डाक जीवन विमा योजनेसाठी विमा सल्लागार भरती : नांदेड येथे थेट मुलाखती

Recruitment postal insurance : डाक जीवन विमा योजनेसाठी विमा सल्लागार भरती : नांदेड येथे थेट मुलाखती

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) व ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत “डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार)” पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठीचे अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग येथे उपलब्ध असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी बायोडाटा, सर्व मूळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखत स्थळ : अधिक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड – 431601 असे आहे. पात्रता व मापदंड वयोमर्यादा : मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे शैक्षणिक पात्रता : केंद्र अथवा राज्य शासन मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्...
Selected Bsf : सीमेवर देशरक्षणाची शपथ; घिसडी समाजातील युवकाची बीएसएफमध्ये निवड

Selected Bsf : सीमेवर देशरक्षणाची शपथ; घिसडी समाजातील युवकाची बीएसएफमध्ये निवड

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| कष्ट, जिद्द आणि देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राबराब राबणाऱ्या घिसडी समाजातील युवकाने थेट सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती होण्याचा मान मिळवला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील घिसडी समाजातील चेल्लार कुटुंबाचा सुपुत्र बीएसएफमध्ये निवड झाल्यानंतर बेंगळुरू येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून आता आपल्या गावाकडे परतत आहे. या अभिमानास्पद यशानिमित्त दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पोटा बु. येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमजुरी व कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने केवळ चेल्लार कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव व परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. “आपल्या समाजातील मुलगा देशसेवेसाठी उभा राहिला,...
error: Content is protected !!