HomeकरियरDr manohar Rathod : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जावे – डॉ....

Dr manohar Rathod : विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जावे – डॉ. मनोहर राठोड

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| बोर्ड परीक्षांचा काळ जवळ येत असताना विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन गुरुकुल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ. मनोहर राठोड यांनी केले.

ते शाळेत आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक स्थैर्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वर्षभर अभ्यासक्रमाचे नियोजनबद्ध अध्ययन केले असल्याने भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी तणावाखाली जातात. पेपर हातात आल्यावर घाबरून न जाता प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी, सोपे प्रश्न आधी सोडवावेत आणि वेळेचे योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. स्वतःवर व पालकांच्या संस्कारांवर विश्वास ठेवून धैर्याने परीक्षा द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका व भीती व्यक्त केली, तसेच शालेय काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यावर मार्गदर्शकांनी समुपदेशनात्मक पद्धतीने समाधानकारक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकताना दिसून आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे कु. सुरोशे, केंद्रप्रमुख श्री केंद्रे सर, श्री चव्हाण सर, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवावे, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments