HomeनांदेडA lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत...

A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

लोहा | पारडी येथील सह्याद्री शाळेच्या माळरानावरील निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेला ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळावा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. थंडीचा गारवा, रात्री पेटलेली शेकोटी आणि उत्साहाने सादर झालेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला.

मेळाव्यात जिल्ह्यातील २५ शाळांतील विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत Bharat Scouts and Guides अंतर्गत ४० शाळांतील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

शोभायात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, क्रीडा शिक्षक बी.डी. जाधव, जिल्हा संघटक जनार्धन इरले, जिल्हा आयुक्त माधुरी जवणे, मेळावा प्रमुख सतीशकुमार वाकोडे, कब-बुलबुल प्रमुख बालाजी तोरणेकर, प्रशिक्षण आयुक्त प्रल्होभ कुळकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

1001537906 scaled A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करून शोभायात्रेचा समारोप मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आला. या वेळी सहभागी विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, केशवराव मुकदम, हरिभाऊ चव्हाण, विठ्ठल पांचाळ आदी मान्यवरांकडून बिस्कीट व केळी वाटप करण्यात आले.

1001537901 scaled A lively program : शेकोटीचा बहारदार कार्यक्रम; स्काऊट-गाईड शोभायात्रेत सामाजिक विषयांचे जिवंत देखावे

शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक, वारकरी दिंडी, गरबा नृत्य, संविधान रॅली, स्वच्छता मित्र, पोतराज, आदिवासी नृत्य, लेक वाचवा, बालविवाह प्रतिबंध, बाल सुरक्षा, जिम्नॅस्टिक, लेझीम, टिपरे अशा विविध सामाजिक आशयाचे जिवंत देखावे सादर झाले. नागरिकांनी या उपक्रमांना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. मेळाव्याचे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे (प्रा.), माधव सलगर (मा.), शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे व जिल्हा संघटक जनार्धन इरले यांनी केले.

थंडीचा गारवा आणि शेकोटीचा जल्लोष
रात्री झालेल्या पहिल्या शेकोटी कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे यांच्या हस्ते झाले. सह्याद्री शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गीत-नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्होभ कुळकर्णी यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments