HomeकरियरScout-Guide Meet : पारडी येथील सह्याद्री शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा

Scout-Guide Meet : पारडी येथील सह्याद्री शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा

• जिल्ह्यातील ५५ शाळांतील २ ते अडीच हजार कब–बुलबुल, स्काऊट–गाईड सहभागी
• १५ वर्षांनंतर लोहा तालुक्यात जिल्हास्तरीय मेळावा
• आयोजनासाठी १२ विविध समित्यांची स्थापना

लोहा| लोहा शहराजवळील पारडी येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक शाळेत ५१ वा जिल्हास्तरीय कब–बुलबुल, स्काऊट–गाईड मेळावा दिनांक १२ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील जवळपास ५५ शाळांमधील दोन ते अडीच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मेळाव्याचे उद्घाटन १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी पहिली शेकोटी आयोजित करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी दुसरी शेकोटी, तर १५ फेब्रुवारी रोजी लोहा शहरातून भव्य शोभायात्रा काढून मेळाव्याचा समारोप करण्यात येणार आहे. तब्बल १५ वर्षांनंतर लोहा तालुक्यात जिल्हास्तरीय स्काऊट–गाईड मेळावा होत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन, मैदान स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास, भोजन व अल्पोपहार, आरोग्य, शिस्त व सुरक्षा, विद्युत व्यवस्था, डेकोरेशन, शेकोटी, शोभायात्रा, आर्थिक व प्रसिद्धी अशा १२ विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

या मेळाव्यात राज्यातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन, सांस्कृतिक देवाणघेवाण, समुदाय विकास उपक्रम, संचलन व शिस्त, कॅम्प क्राफ्ट, कॅम्प फायर, पायोनियरिंग प्रकल्प, शारीरिक कसरती, लोकनृत्य, बँड पथक आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. “तयार राहा” हे स्काऊट–गाईडचे घोषवाक्य असून निःस्वार्थ सेवा, स्वावलंबन, उत्तम नागरिकत्व व विश्वबंधुत्व ही त्यांची मूलतत्त्वे आहेत.

मेळाव्यासाठी गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, जिल्हा संघटक जनार्दन ईरले, जिल्हा गाईड संघटक माधुरी जवने, मेळावा प्रमुख सतीषकुमार वाकोडे, कब–बुलबुल मेळावा प्रमुख बालाजी तोरणेकर, स्काऊट–गाईड प्रशिक्षण आयुक्त भागिरथी बच्चेवार, तसेच आयोजक सुदर्शन शिंदे व सहयाद्री शाळेतील शिक्षक–कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

शिक्षणाधिकारी (प्राथ.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) माधव सलगर, जिल्हा चिटणीस गंगाधर राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व विविध समिती प्रमुख यांचे सहकार्य लाभत आहे. पारडी येथील सह्याद्री शाळेचे संस्थापक सुदर्शन शिंदे यांनी मेळाव्यासाठी शाळेचे भव्य मैदान व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षणप्रेमी व नागरिकांनी या जिल्हास्तरीय मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments