श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| CET आणि NEET परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवासेनेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा सराव आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.


ही मॉक टेस्ट विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामध्ये वेळेचे नियोजन, प्रश्न सोडवण्याची पद्धत, आणि अभ्यासाचे मूल्यमापन यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.युवासेना नेते आदित्य ठाकरे तसेच खा.नागेश पाटील आष्टीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचा शहरी भागासह ग्रामिण भागातील विद्यार्थ्याना फायदा झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.यश खराटे यांनी हा उपक्रम तिर्थक्षेञ असलेल्या माहूरगडच्या मौजे.अंजनखेड येथील साविञीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच हदगांव येथील श्री दत्त महाविद्यालय येथून दि.२९ मार्च २०२५ पासून सुरुवात केली आहे.


युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. CET आणि NEET परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनी या मॉक टेस्टमध्ये सहभागी होऊन परीक्षेसाठी आपली तयारी अधिक मजबूत करावी, असे आवाहन युवासेनेचे जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी त्यांची तयारी तपासण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि परीक्षेचा ताण कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अॅड.यश ज्योतिबा खराटे, युवासेना जिल्हा प्रमुख नांदेड