श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील सर्व्हे नं.१०३ मधील मस्काई माता, म्हसोबा देव या दोन्ही मंदीराकडे जाणारा पांदण रस्ता व बाळसमुंद्र या पवित्र कुंड मार्गावरचे अतिक्रमण तातडीने काढून तसा अहवाल सात दिवसाचे आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा.असा आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि. २७ फेब्रु. रोजी तहसीलदार माहूर यांना दिला आहे.परंतु त्यानुसार कुठल्याही चौकशी, कार्यवाहीला, अद्याप सुरुवात झाली नसल्याचे शरद राठोड यांनी म्हटले आहे .


बारी समाजाचे कुलदैवत असलेल्या मस्काई देवी, म्हसोबा यांचे साधे ओटे अनेक दिवसांन पासून आहेत व सर्व्हे नं. १०३ मधील बाळसमुंद्र या पुरातन कुंडावर जाणाऱ्या पांदण रस्त्या आहे त्यावर काही धन दांडग्या भुमाफियांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ईच्छा असूनही भाविकांना तिथे दर्शनासाठी जाता येत नाही.


बारी समाज बांधव व ओबीसी समाज बांधवाचे कू्लदैवत,मस्काई माता मंदीर, म्हसोबा देव हे अनेक वर्षापासून.शहरातील पेट्रोल पंप जवळ आहेत भुमाफियांनी मंदीराचे ओटे फोडून ती जमिन ताब्यात घेतली आहे. लग्नप्रसंगी, लहान मुलांची जावळे व शुभ कार्य प्रसंगी मंदिराजवळ दर्शन करण्याकरीता जावे लागते परंतू जाणा-या पांदण रस्त्यावर भूमाफीयांनी आपली जागा आहे, असे म्हणून तेथून जावू देत नाही.

नकाशाप्रमाणे पाहणी करावी अशी मागणी माहूर पं. स. चे माजी सभापती शरद राठोड यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात मांडली होती. त्यानुसार सदर प्रकरणी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.परंतु त्या संदर्भात आज पावेतो कुठल्याही कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. त्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न शरद राठोड यांनी उपस्थित केला आहे.
