Revenue Department : जिल्हाधिकारी यांच्या पत्राची महसूल विभागाने सांधी चौकशी केली नाही – शरद राठोड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील सर्व्हे नं.१०३ मधील मस्काई माता, म्हसोबा देव या दोन्ही मंदीराकडे जाणारा पांदण रस्ता व बाळसमुंद्र या पवित्र कुंड मार्गावरचे अतिक्रमण तातडीने काढून तसा अहवाल सात दिवसाचे आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा.असा आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि. २७ फेब्रु. रोजी तहसीलदार माहूर यांना दिला आहे.परंतु त्यानुसार कुठल्याही चौकशी, कार्यवाहीला, अद्याप सुरुवात झाली नसल्याचे शरद राठोड यांनी म्हटले आहे .
बारी समाजाचे कुलदैवत असलेल्या मस्काई देवी, म्हसोबा यांचे साधे ओटे अनेक दिवसांन पासून आहेत व सर्व्हे नं. १०३ मधील बाळसमुंद्र या पुरातन कुंडावर जाणाऱ्या पांदण रस्त्या आहे त्यावर काही धन दांडग्या भुमाफियांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ईच्छा असूनही भाविकांना तिथे दर्शनासाठी जाता येत नाही.
बारी समाज बांधव व ओबीसी समाज बांधवाचे कू्लदैवत,मस्काई माता मंदीर, म्हसोबा दे...
