Wednesday, July 8

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, करियर
नांदेड | "नीट परीक्षा 2025" ही रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे....

online system ; यंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने

नांदेड, करियर
नांदेड| शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11 वीचे प्रवेश हे शहरी व ग्रामीण दोन्ही भागांसाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेबसाईडवर नेहमी येणाया वेळापत्रकांना तसेच मार्गदर्शक सुचनांना पाहावे. तसेच काही अडचणी येत असल्यास तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालय, संबंधित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कार्यालयात मदत कक्ष लवकरच स्थापण होणार असून यासाठी आपणास वेगळयाने यथावकाश माहिती दिली जाणार आहे. तरी जिल्हयातील सर्व पालक, विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे व्यवस्थापन यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांनी केले आहे. मागील काही वर्षापासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या महानगरपालि...
Nanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित

Nanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l पोलीस विभागामध्ये सलग अठरा वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलीस अंमलदार सुशील कुबडे यांना महासंचालक सन्मान चिन्ह (पदक) देऊन सन्मानित केले आहे. सध्या कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलीस स्टेशनला आठ महिन्यापासून कार्यरत असलेले सुशील कुबडे हे पोलीस दलात २००७ मध्ये भरती झाले सून त्यांनी यापूर्वी पोलीस स्टेशन वजीराबाद येथे सहा वर्षे त्यानंतर जिल्हा विशेष शाखा नांदेड येथे सहा वर्षे उत्कृष्ट सेवा ( कर्तव्य ) बजावले आहेत . तसेच सध्या आठ महिन्यापासून पोलीस स्टेशन उस्माननगर येथे बिट अमलदार म्हणून कामकाज पाहत आहेत त्यांनी आपल्या पोलीस खात्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस पदक देऊन त्यांना दि. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महारा...

entrance examination ; नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष 

नांदेड, करियर
नांदेड l राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे. परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्य...
Shreya Intelligence ; श्रेया इंटेलिजन्स मधे, महाविरा घोरबांडचे यश

Shreya Intelligence ; श्रेया इंटेलिजन्स मधे, महाविरा घोरबांडचे यश

करियर, नांदेड
उस्माननगर l कस्तुरी संस्कार केंद्र बाबानगर नांदेडची , वर्ग चवथीची विद्यार्थीनी महाविरा प्रल्दराव घोरबांड ने श्रेया इंटेलिजन्स अकॅडमी सर्च एक्झाम मधे, राज्यस्तरीय सत्ताविसावा क्रमांक तर केंद्रस्तरिय सहावा क्रमांक मीळवुन प्राविण्य मीळविले आहे. महाविरा हि महात्मा फुले बाबागर शाळेतील सहशिक्षक व सुपरिचित गोसेवक प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांची कन्या आहे. या मीळविलेल्या यशा बद्दल शाळेतील शिक्षक वृंद व मीत्र परिवारातुन तीचे अभिनंदन होत आहे....
District Collector Rahul Kardile  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

District Collector Rahul Kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालिन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी वर्धा या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम, 2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी ‘सेवा दूत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा पुरविण्यासाठी विशेष कामगिरी केली. या विशेष कामगिरीबाबत केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्थापित झाला आहे. या कामगिरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या...
Sachin Gaikwad honored : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सचिन गायकवाड यांचा स्टार ऑफ एमजीएम पुरस्काराने सन्मान

Sachin Gaikwad honored : पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सचिन गायकवाड यांचा स्टार ऑफ एमजीएम पुरस्काराने सन्मान

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड येथील महात्मा गांधी मिशन च्या वतीने सचिन बाजीराव पाटील गायकवाड यांना स्टार ऑफ एम.जी.एम.पुरस्कार श्री अबिनाश कुमार एसपी नांदेड यांच्या हस्ते एमजीएम महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले . यावेळी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाटकर, महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ ऑफ कंप्युटर सायन्स आणि आयटीचे प्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, उपप्राचार्या डॉ.कांचन नांदेडकर, बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. चेरकर, बीसीए विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता भोपी, बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. गोंड धनंजय बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर, वर्गप्रमुख प्रा. रक्षंदा करकरे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्र परिवार तसेच सगे सोयरे यांच्याकडून सचिन...
Genius Kids English School ; जीनियस किड्स इंग्लिश स्कूल स्कूलची स्कॉलरशिप मध्ये गगन भरारी

Genius Kids English School ; जीनियस किड्स इंग्लिश स्कूल स्कूलची स्कॉलरशिप मध्ये गगन भरारी

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l शहरातील जीनियस किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे वर्ग ५ आणि वर्ग ८ करिता घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेकरीता प्रविष्ट झाले होते. शाळेतून वर्ग ५ स्कॉलरशिप चे शिवार्थ संदीप जाधव, विराट प्रशांत भोपळे, सोहम गजानन घोगरे, आदिप युनुस मलनस, वक्रतुंड राजाराम गंधेवाड, आरव मिलिंद कोटावर व इयत्ता ८ मधुन स्कॉलरशिपचे पार्थ सचिन कोशटवार , श्रवण चैतन्य उबाळे, अथर्व बसवेश्वर मंगनाळे, देवार्थ आशिष जयस्वाल, वैभवी दिनेश आरगुलवार, प्रज्वल रवी कासोळकर, अनुश्री पांडुरंग सोलंके, क्षितिज भाग्यवान भवरे, नियती विक्रम राठोड, श्रीपाद देवानंद जाधव, अल्मास इस्लाईम दुंगे, वेदांत चंद्रकांत रिठे, ऋषिकेश प्रमोद पिल्लेवार, आयुष संघानंद वंजारे , मिस्टी अजय जयस्वाल,असे एकूण 21 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र ठरले आहे. स्थानिक माहूर शहरातील...
Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित

Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड येथील भाग्यनगर-आनंद नगर रोडवरच्या ग्रँड तुलसी हाॅॅॅटेल मध्ये नुक्त्याच एका भव्य दिव्य कार्यक्रमात माय एफ एम समूह व प्रझेंटिंग स्पाॅन्सार मंथन इन्फ्राकेयरचे मा.पंकज शर्माजी व सौ.शर्माजी,असोशियट स्पाॅन्सार म्हणून नारायणी गर्ल्स होस्टेलचे मा.तेजस हळदे पाटील, आणि आॅटोमोबाईल्सचे पार्टणर राजयोग टाॅयाटोचे मा.व्यंकटेश पुदुचेत्ती या दिग्गजांच्या वतीने नांदेड शहरातील आरोग्य क्षेत्रात सातत्याने, सचोटिने, निस्प्रूह भावनेने तथा मानुस्कीच्या दृष्टीकोणातून समाजाच्या तळागाळातील सामान्य जनतेसाठी ज्यांनीं ज्यांनी , सामाज ऋण फेडण्याचे प्रयत्न केलेले आहेत,करत आहेत अशा वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तपस्वींचा गुणीजनांचा शोध घेऊन अनेकांना गौरविण्यात आले! त्यात वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक,सांस्कृतिक, सामाजिक,कृषी,क्रिडा,संगित, गरजवंत ज्येष्ठ नागरिक उत्थान आदि क्षेत्रात सतत कार्यरत असणारे कोरो...
Ashram School Vaghala cancelled : माध्यमिक आश्रमशाळा वाघाळाची मान्यता रद्य; विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

Ashram School Vaghala cancelled : माध्यमिक आश्रमशाळा वाघाळाची मान्यता रद्य; विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

करियर, नांदेड
नांदेड| इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या माताजी शिक्षण संस्था नांदेड वाघाळा संचलित माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा ता. जि. नांदेड या आश्रमशाळेची मान्यता 21 एप्रिल 2025 रोजी रद्य करण्यात आली आहे. याबाबत संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांनी पत्र निर्गमित केले आहे. या आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित पालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे....
error: Content is protected !!