Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

SSC Result Himayatnagar ; एस. एस. सी. बोर्ड परिक्षेत यंदाही मुलींनी मारली बाजी. ; हिमायतनगर तालूक्याचा सरासरी निकाल ८७.७३%

SSC Result Himayatnagar ; एस. एस. सी. बोर्ड परिक्षेत यंदाही मुलींनी मारली बाजी. ; हिमायतनगर तालूक्याचा सरासरी निकाल ८७.७३%

करियर, नांदेड
हिमायतनगर। इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. क्षमा देबडवार या विद्यार्थ्यांनीने ९६.२०% गुण प्राप्त करून तालूक्यातून प्रथम येण्याचा बहूमान मिळवीला आहे. तर राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैष्णवी रायेवार हिने ९५.६० % गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळविला आहे. हिमायतनगर तालुक्यात १ हजार १०९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यांपैकी ९७३ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. ९१.६६% जिल्हा परिषद हायस्कूल चा या वर्षी अप्रतिम राहीला आहे. तर राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ९६.९७ % , हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा ९२.४२%, माध्यमिक विद्यालय ५९.०९%, जिल्हा परिषद हायस्कूल जवळगांव ९८.२६%, जिल्हा परिषद हायस्कूल कामारी ९८.११ %, राजा भगीरथ विद्यालय धानोरा ८६.८४%, महादजी पाटील विद्याल...
Old pension scheme : नांदेड जिल्ह्यातील 259 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

Old pension scheme : नांदेड जिल्ह्यातील 259 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

करियर, नांदेड
नांदेड| शिक्षकी जीवन संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या घडणुकीसाठी वाहून घेतलेल्या जिल्हा परिषदेतील 259 शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. 2005 पूर्वी जाहिरात व अधिसूचना निघालेल्या, मात्र नियुक्ती 1 सप्टेंबर 2005 नंतर झालेल्या या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी नुकतेच निर्गमित कले आहेत, यामुळे शिक्षक वर्गात आनंद व समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकी जीवनातील निष्ठेचा, समर्पणाचा व न्यायाच्या प्रतीक्षेचा सन्मान आहे. जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने हा विषय काटेकोरपणे हाताळला. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर...
Prateek Sonawane ; प्रतीक सोनवणे अमेरिकेत एम.एस. मास्टर्स डिग्रीने सन्मानित

Prateek Sonawane ; प्रतीक सोनवणे अमेरिकेत एम.एस. मास्टर्स डिग्रीने सन्मानित

नांदेड, करियर
नांदेड l मुळचा नांदेड येथील प्रतीक संजयकुमार सोनवणे यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉस अ‍ॅट अर्लिग्टंन येथून एम.एस. डिग्री (इंजिनिअरींग) पूर्ण केली. दोन वर्षांच्या कोर्समध्ये प्रतीक सोनवणे यांनी देदीप्यमान यश मिळवित अमेरिकेत नांदेडचे नाव उज्वल केले. तेथील विद्यापीठाचे मान्यवर पदाधिकारी तसेच प्राध्यापकांच्या हस्ते प्रतीक सोनवणे यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रतीक सोनवणे हे नांदेड मर्चन्टस् को-ऑप. बँकेतील संजयकुमार सोनवणे यांचा मुलगा आहे. प्रतीक यांचे प्राथमिक शिक्षण नागार्जुना पब्लिक स्कूल येथे झालेले आहे. तर बारावी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय व इजिनिअरींगची पदवी एम.जी.एम. महाविद्यालय नांदेड येथून झालेली आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉस अ‍ॅट अर्लिग्टंन येथे गुणवत्तेवर एम.एस.साठी प्रवेश मिळाला होता. या यशाबद्दल प्रतीक सोनव...
Transfers of employees : जिल्हा परिषद बदली अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Transfers of employees : जिल्हा परिषद बदली अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेअंतर्गत आज ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पार पडल्या. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. गंगथळे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता संवर्गातील एकूण ३ बदल्या झाल्या असून त्यापैकी एक प्रशासकीय कारणास्तव व २ बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या. बांधकाम विभागात एकूण १८ बदल्या पार पडल्या असून ...
४० वर्षांपूर्वीचे ” अबोल “वर्गमित्र भावविश्वात रमले; मालपाणी मूकबधिर मध्ये स्नेह मेळावा संपन्न

४० वर्षांपूर्वीचे ” अबोल “वर्गमित्र भावविश्वात रमले; मालपाणी मूकबधिर मध्ये स्नेह मेळावा संपन्न

नांदेड, करियर
नांदेड l हातवारे व चेहऱ्यावर वेगवेगळे भाव मनातल्या मनात शालेय जीवनातील आठवणी.एकमेकाच्या फार वर्षानंतर गाठीभेटी ४०वर्षापूर्वी शिकत असलेल्या "अबोल"भावविश्वात रममाण झालेले वर्गमित्र त्यातच ख्याली खुशाली अन सुख दुःखावर हळुवार फुंकर घालत हे माजी विद्यार्थी ज्या शाळेत घडले "त्या मालपाणी"मूकबधिर शाळेच्या मुख्याध्यापक- शिक्षक ,व्यवस्थापनाच्या उपस्थितीत आपल्या "मूकबधिर "भाषेत जीवनाच्या आठवणी व्यक्त करत होते .या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा "बोलक्याच्या " राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या मगनपूरा नांदेडश्री. रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयात मूकबधिर माजी विद्यार्थी संघाचा १९८२ ते २०२० या ३८ वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. उद्घाटन भाजपा महिला मोर्चाच्या . पुनमताई राजेश पवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटी चे पदाधिकारी . विजय मालपाणी, डॉ लक्ष्मणकांत बजाज , कुणाल वि...
results : पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ८४ टक्के

results : पंचशील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ८४ टक्के

करियर, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून, विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून कु.हेंद्रे भारती विजय ७७.३३ टक्के,कदम रितेश सुनील ७४.८३ टक्के,कु.प्राजक्ता अजय पोंगाणे ७३.०० टक्के,धीरज अशोक पाईकराव ७२.०० टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. तर कला शाखेतून कु.पवार दुर्गा देविदास ८०.५०,कु.गायकवाड पुजा पांडूरंग ७७.१७,कु. हरणे निकीता राजू ७६.१७,कु.पऊळ श्रध्दा अशोक ७५.१७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत एकूण १६१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते सर्वच १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेत एकूण १७६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्य...
Congratulations : बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

Congratulations : बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

करियर, नांदेड, मुंबई
• बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.88 टक्के • मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 ने जास्त मुंबई| उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी दि. 5 मे 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला. शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक ...
Students felicitated : केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा स्तुत्य उपक्रम आईच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Students felicitated : केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा स्तुत्य उपक्रम आईच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करियर, नांदेड
उस्माननगर l राज्य पुरस्कार प्राप्त तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी आईच्या पुण्यतिथी निमित्त वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणीक क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. वडगाव ता. लोहा येथील भुमिपुत्र , राज्य पुरस्कार प्राप्त , तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या मातोश्री कै.सुभद्राबाई संभाजीराव पा.काळे यांच्या चतुर्थ ( चौथ्या ) पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून दि .३ मे २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सरस्वतीबाई विनायक पा काळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव काळे , पोलिस पाटील सौ. विद्या कानगुले , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जरीन मॅडम , सहशिक्षक मनोहर पवळे , शरद पवार , कांबळे सर ...
NEET (UG) entrance examination : नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

NEET (UG) entrance examination : नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

करियर, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे. परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्या...

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, करियर
नांदेड | "नीट परीक्षा 2025" ही रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे....
error: Content is protected !!