HomeनांदेडAadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन; लातूर विभागातील 4 जिल्ह्यातील 60 शासकिय वसतीगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे

नांदेड| राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विषेस सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर विभागातील 4 जिल्ह्यातील 60 शासकिय वसतीगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या वसतीगृहात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लातूर विभागतील लातूर 25, नांदेड 16, धाराशिव 11, व हिंगोली ०८ अशी एकूण ६० वसतीगृह कार्यरत आहेत. सामाजिक विभागाच्या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासह इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या क्षमतेनुसार प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, मोफत जेवण व नाष्टा, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य , स्पर्धा परीक्षांचे पुस्तके मोफत पुरविली जातात.

या वसतीगृहासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षा करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लातूर विभागातील समाज कल्याण विभागाच्या, लातूर, नांदेड, हिंगोली व धाराशिव या कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांशी तसेच संबंधित वसतीगृहाच्या गृहप्रमुख व गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments