हिमायतनगर| हिमायतनगर – गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे नेतृत्वाखाली गोल्ला गोलेवार यादव समाज शिष्टमंडळाने व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांची नांदेड येथे निवासस्थानी हिमायतनगर तालुक्यातील समाजातील पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन भगवान श्रीकृष्ण व यादव समाजासाठी सभागृहसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब, प्रदेश उपाध्यक्ष पी.पी.फाजेवाड, जेष्ठ मार्गदर्शक पी.जी.रुद्रवाड सर,जिल्हा उपाध्यक्ष रमेश रामपुलवार, जिल्हा सचिव अशोक कासळालीकर, बालाजी शैनेवाड सर, तुकाराम कैलवाड, नारायण वटपलवाड, हिमायतनगर तालुका तालुका उपाध्यक्ष श्याम जक्कलवाड, हिमायतनगर ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, ता.कार्यध्यक्ष नारायण कोरेवाड, उपस्थित होते.

अभिषेक बकेवाड म्हणाले की, आता समाज एकजुट करण्याबरोबरच जागा उपलब्ध करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्र मिळून येणाऱ्या काळात गोल्ला-गोल्लेवार यादव समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आकेमवाड यांच्या नेतृत्वाखाली, हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी व समाज बांधवांनी आदरणीय माजी, मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांची भेट घेऊन हिमायतनगर तालुक्यात यादव समाजासाठी सभागृहच्या जागेसाठी मागणी करत संध्या गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या अस्तित्वासाठी व जागे साठी ॲक्शन मोडवर असल्याचं, राष्ट्रीय यादव महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा नांदेड जिल्हाध्यक्ष युवक अभिषेक बकेवाड सांगितले.
