MP Ashokrao Chavan : खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
नांदेड, अनिल मादसवार| राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर नांदेड ते अर्धापूर दरम्यानच्या अपघातप्रवण ठिकाणांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे जीवितहानी होत आहे. या ठिकाणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांचा धोका कमी करण्याच्या मागणीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट (MP Ashokrao Chavan met Nitin Gadkari) घेतली. संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत सदर महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांना आणि वाहनचालकांना अनेक ठिकाणी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने, भरधाव अवजड आणि चारचाकी वाहनांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
दूध डेअरी चौक ते धनेगाव पाटी दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या मुद्द्यावर याप्रसंगी विस्तृत चर्चा झाली. धनेगाव येथील नागरिकांचे या उड्डाणपूलाबाबत आक्षेप असल्याचे मी त्य...



