नवीन नांदेड l प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम,यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम ‘घेण्यात आला.


सुरुवातीला मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज कंतेवार,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड, यांनी पाद चाऱ्यांसाठी रस्ता सुरक्षा टिपा व वाॅक आँन राईट संकल्पना मांडून वाहतूक चिन्हांची माहिती आणि रस्ते अपघातांची कारणे विद्यार्थ्यांना पटवून सांगितली,हेमंत साळुंखे,सहाय्यक मोटर परिवहन निरीक्षक यांनी बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे, व हेल्मेट व सीट बिल चे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे संयोजक श्रीपात पाटील शिंदे मांजरमकर अध्यक्ष कै. गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मांजरम, यांनी विद्यार्थ्यांना अपघातग्रस्तांना मदत कशी करावी, हेल्मेट न वापरल्याने त्याचे होणारे परिणाम,अपघातामुळे दरवर्षी दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात असे सांगून वाहतुकीचे धडे दिले, आणि रस्ते की पाठशाला ही पुस्तक 1200 विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मोफत वाटप करून रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगून संस्थेच्या कामगिरीचे वर्णन केले.


या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ हंबर्डे,माजी जि.प. सदस्य साहेबरावजी हंबर्डे,विश्वनाथ रावजी हंबर्डे, व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक उदय हंबर्डे, शिवाजी वेदपाठक, कृष्णा बिरादार, आनंद बळगे, पाटील, इमनेलू, विकास दिग्रसकर, यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.खदीर यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वलाताई जाधव मॅडम यांनी मानले .




