Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Special Gram Sabha ; शहापूर येथे विशेष ग्रामसभा संपन्न;  तंटामुक्त समिती स्थापन – NNL

Special Gram Sabha ; शहापूर येथे विशेष ग्रामसभा संपन्न;  तंटामुक्त समिती स्थापन – NNL

सोशल वर्क, नांदेड
देगलूर/शहापूर। तालुक्यातील मौजे शहापूर येथील विठ्ठलेशवर सभागृहात नवरात्रोत्सव काळात आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील विविध कामकाजाचे गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. विशेष बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील बंद असलेली तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात आले तसेच तंटामुक्ती समिती मध्ये सरपंच उपसरपंच पोलिस पाटील वैद्यकीय अधिकारी शाळेतील शिक्षक पत्रकार जेष्ठ नागरिक पोलिस कर्मचारी असे तेवीस लोकांचे समिती नेमण्यात आले. ग्रामसभेत अतीकरमन हटाव घरकुल योजना गोठा पालन शेत तळे यांचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी ग्रामसेवक कोटगिरे यांनी केले. यावेळी सो सरपंच कांबळे उपसरपंच गणेश चामावार मलरेडी यालावार बालाजी शातापुरे अविनाश चितलवार मलनरेडी चितलवार विश्वभर पाटील गगारेडी कोटगिरे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी कनकटे गणेश माडपते...
Women’s Bhajan Competition ; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे महिला भजन स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप – NNL

Women’s Bhajan Competition ; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे महिला भजन स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी, नांदेड येथे दि. 07 ऑक्टोंबर 2024 सोमवार रोजी खुली महिला भजन स्पर्धा 2024-2025 पार पडली. या भजन स्पर्धेमध्ये एकुण 11 महिला भजन स्पर्धक सहभाग नोंदवून आपापले भजन सादर केले. पैकी 3 स्पर्धक निवडण्यात येऊन रोख धनादेश प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय 2 हजार, उत्तेजनार्थ एक हजार असे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र चौफाळा नांदेड, द्वितीय क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी, नांदेड, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वसमत हे विजेते ठरले असून उत्तेजनार्थ इतर सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को- ऑप. बँकेचे भारत चव्हाण हे होते तर विचारपी...
Bodema festival ; शहापूर येथे बोडेमा सण उत्साहात साजरा – NNL

Bodema festival ; शहापूर येथे बोडेमा सण उत्साहात साजरा – NNL

धार्मिक, नांदेड
देगलूर/शहापूर। तेलंगणा महाराष्ट्र राज्यच्या सीमेवर असलेल्या मौजे शहापूर येेेथ दसऱ्या निमित्ताने खेळण्यात येेेणारा बोडेमा सण उत्स्फूर्तपणे वातावरणात साजरा करण्यात आला. गाव तेलंगणाच्या सिमेवरती वसलेले असून शहापूर येथील महिलांचे आवडता छंद सन असल्याने फुलांचा बडमा तयार करून नाचत गात बागडत आनंद गगनात मावेनासा होतो. महिलांनी बडमाची तयारी एक दिवस अगोदर पासून म्हणजे शिवारात फिरून वेगवेगळ्या प्रकारचे फुले पाने रंगाची रगोटी करून अगोदर ज्याच्या त्याच्या गल्लोगल्लीत महिलां गोळा होवून तेलगू तील गाणी लावून बडमा सभोवताली गोळा होवून गीताच्या तालावर आनंद गगनात मावेनासा होतो हा सण उत्सव तेलंगणाच्या धर्तीवर जोमाने साजरा करतात त्यांचाच भाग म्हणून शहापूर येथील जास्ती जास्त महिला तेलगतील सहवास असल्याने त्याच धर्तीवर शहापूर येथे देखील जोमात वर्षाकाठी एक वेळेस उत्साहात साजरा करण्यात येतो महिलांचा आनंद गगना...
Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL

Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। गावठी पिस्टल व अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात" घेतले आहे त्याच्याजवळ अग्निशास्त्रं जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध्द अग्नीशस्त्र बाळगनाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 06/10/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, महाराणा प्रताप चौक ते हनुमानगड कमानीच्या बाजुस एक इसम त्याचे कंबरेला पिस्टल घेवुन तो परीसरात दहशत / भीती दाखविण्याचे उ‌द्देशाने अवैध्द अग्नीशस्त्र बाळगुन आहे. यावरून पोलीस पथक सदर ठिकाणी जाऊन पोचले आणि अग्निशास्त्रं बाळगणाऱ्या त्यास ताब्यात घेउन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावा शैलेश बलुसिंग परमार वय 26 वर्ष रा. गोपाल नगर नांदेड असे सांगीतले त्यावरुन आम...
Nanak Sai Foundation ; नानक साई फाऊंडेशन च्या १० व्या संत नामदेव घुमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : यात्रेची जय्यत तयारी सुरू – NNL

Nanak Sai Foundation ; नानक साई फाऊंडेशन च्या १० व्या संत नामदेव घुमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : यात्रेची जय्यत तयारी सुरू – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू असून यात्रेला दरवर्षी प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे. घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर,शक्तीपिठ माता नैनादेवी (हिमाचल प्रदेश),आनंदपूर साहिब,कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम,भाकरानंगल डॅम,वाघा-अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग,महाभारत (धर्मनगरी) कुरुक्षेत्र,माता भद्रकाली,फतेहगड साहिब,बस्सी पठाणा,वीरासते खालसा म्युजियम,लवकुश जन्मस्थळ,परजीया कलान (खेडेगाव) या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाते. यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदर...
Dhadak Morcha ; उमरखेड नगर परिषदेवर नागरी सुविधांसाठी सीटू आणि लोकविकासचा धडक मोर्चा – NNL

Dhadak Morcha ; उमरखेड नगर परिषदेवर नागरी सुविधांसाठी सीटू आणि लोकविकासचा धडक मोर्चा – NNL

उमरखेड, सोशल वर्क, हिंगोली
उमरखेड | लोकविकास समन्वय संघर्ष समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या वतीने दि.८ ऑक्टोबर रोजी नाग चौक येथून दुपारी एक वाजता नगर परिषद उमरखेड वर धडक मोर्चा काढण्यात आला. उमरखेड नगर परिषद क्षेत्रातील लोकशाहीर डॉ.कॉ.अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृह निर्माण संस्थे मध्ये मागील २५ वर्षांपासून कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. तेथे रस्ते, नाल्या, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, खेळाचे मैदान,ओपन स्पेश, सौचालय, घरकुल आदी मूलभूत आणि नागरी सुविधा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात पुरविण्यात आल्या नाहीत. सदरील मागासवर्गीय व मातंग समाजाची वस्ती असलेला परिसर हा माजी आमदार देवसरकर यांच्या घरा शेजारी असलेल्या धोंगडे पीर जवळ आहे. उपरोक्त साठे नगरासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन खुपच उदासीन आहे. शासनाकडून दलित वस्तीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असताना देखील तेथील रहिवास असणाऱ्या पीडितांना अजू...
Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अॅक्वेटीक असोसियशन यांच्या तर्फे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक 21.09.2024 ते दिनांक 22.09.2024 दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात नांदेड पोलीस दलातील जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर, पोलीस हवालदार यांनी सहभाग घेवुन सदर स्पर्धेत 50 मीटर बटर फ्लाय, 4X50 मीटर मिडले रिले. 4X50 मीटर फ्रिस्टाईल रिले मध्ये तीन सुवर्ण व 100 मीटर बटर फ्लाय, 50 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत दोन रजत पदक पटकावले आहेत. सदर स्पर्धेत मुंबई, नागपुर, कोल्हापुर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेड सह इतर जिल्हयातुन 550 खेळाडुनी भाग घेतला होता. सदर अंमलदार यांना कवयात निर्देशक व क्रिडा प्रमुख संतोष सोनसळे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. या अंमलदारांनी उत्कृष्ट जलतरण पटु म्हणुन नांदेड पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे. म्हणुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी योग्य ते...
Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL

Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL

राजकीय, नांदेड
उस्माननगर | आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील मतदार राजांनी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन सेवा जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा ,प्रमुख, उमेदवार प्रा.मनोहर धोंडे सर यांनी केले. माळाकोळी येथील प्रचंड जनसमुदायाची सभा ही विजयी सभा वाटते असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी माळाकोळी येथील प्रचंड जाहीर सभेत केले. सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख तथा लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ ऑक्टोबर रोजी लोहा शहरातुन भव्य दिव्य अशी हजारोंच्या संख्येने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदरील मोटारसायकल रॅली ही लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोहा बायपास रोड असा रोड शो करुन लोहा,पोलेवाडी, खेडकरवाडी व्हाया माळाकोळी अशी काढण्यात आली या ...
Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

राजकीय, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी नवरात्र महोत्सवामध्ये जोमाने कामाला लागलेली किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच मतदारसंघांमध्ये जम बसलेले व शरदचंद्र पवार गटाचे प्रबळ दावेदार असलेले उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक हे प्रचार माध्यमातून कशे मागे राहतील सद्यस्थितीत प्रदीप नाईक हे या प्रचार यंत्रणेत आघाडीवर आहेत व त्यांच्या सुनबाई डॉक्टर सुप्रिया नाईक यांनी तर चक्क महिला मंडळाच्या दांडिया मध्ये जाऊन सहभाग नोंदवत उपस्थिती दर्शवली. तालुका भरातील दुर्गा मंडळाला आवर्जून भेटी देऊन खना नारळाने ओठी भरताना दिसून येत आहेत. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ इस्लापूर, शिवनी, मारलागुंडा, दयाळ धानोरा , कंचली , गोंडेमहागाव, चिखली अंदबोरी,मलकापूर खेरडा, घोटी, दत्त नगर, सिरमेठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किनवट मह...
Money in Loha Constituency : लोहा मतदार संघात पैशाची आस; नवख्यांचा “लहान तोंडी – मोठा घास”…! -NNL

Money in Loha Constituency : लोहा मतदार संघात पैशाची आस; नवख्यांचा “लहान तोंडी – मोठा घास”…! -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| पूर्वीचा कंधार या विधानसभा मतदारसंघाला वैचारिक परंपरा आहे. या मतदारसंघातील काही भाग मुदखेड मतदार संघात होता आणि त्या भागाने या राज्याचे नेतृत्व केले. पर्यायाने आपल्या मतदार संघाने राज्याला मुख्यमंत्री तसेच दोन वेळा खासदार सुद्धा दिला. चळवळ ..संघर्ष..वैचारिक लढाई.. विविध सत्याग्रह.. शेतकरी आंदोलने... आणि थेट पंतप्रधान याच्याशी संवाद ही राजकीय पार्श्वभूमी असलेला मतदार संघ आता वैचारिकदृष्टया "दुबळा" तत्वहीन" होतो आहे की काय (?) अशी शंका उपस्थित होत आहे. कोणतीही वैचारिक वा विकासाची पार्श्वभूमी नसलेले "अमाप व अनियंत्रित धनशक्तीच्या बळावर आपला जम बसू पाहत आहेत. लोकांनाही पैशाची आस लागली. कर्तृत्वशून्य असलेले लहान तोंडी मोठा घास घेत वाट्टेल ते बोलत आहेत. मतदारसंघ "प्रयोगशाळा"होऊ नये..वैचारिक आणि सकारात्मक राजकीय विरोधाची परंपरा असलेल्या या भूमीत पैसे दिले की मत मिळते. असा भ्रम "भावी " व ...
error: Content is protected !!