किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी नवरात्र महोत्सवामध्ये जोमाने कामाला लागलेली किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच मतदारसंघांमध्ये जम बसलेले व शरदचंद्र पवार गटाचे प्रबळ दावेदार असलेले उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक हे प्रचार माध्यमातून कशे मागे राहतील सद्यस्थितीत प्रदीप नाईक हे या प्रचार यंत्रणेत आघाडीवर आहेत व त्यांच्या सुनबाई डॉक्टर सुप्रिया नाईक यांनी तर चक्क महिला मंडळाच्या दांडिया मध्ये जाऊन सहभाग नोंदवत उपस्थिती दर्शवली.


तालुका भरातील दुर्गा मंडळाला आवर्जून भेटी देऊन खना नारळाने ओठी भरताना दिसून येत आहेत. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ इस्लापूर, शिवनी, मारलागुंडा, दयाळ धानोरा , कंचली , गोंडेमहागाव, चिखली अंदबोरी,मलकापूर खेरडा, घोटी, दत्त नगर, सिरमेठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किनवट महिला तालुकाध्यक्ष सौ. अनुसयाताई जमादार, सौ.मधुरीताई बालाजी बामणे,सौ.प्रा. किर्तिकाताई राजु सुरोशे, ,सौ.प्रमिलाताई ज्योतीबा गोणारकर, सौ.शकुंतलाताई उल्हास राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्र.प्रवीण मॕकलवार , रामु मामा.


युवक तालुकाध्यक्ष तथा किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाजी बामणे, कमढाला उपसरपंच बालाजी पाटील भरकड, ,घोटी ग्राम पंचायत उपसरपंच तथा किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजू पाटील सुरोशे, गणेशपूर येथील जेष्ठ कार्यकर्ते मारोती पाटील सुरोशे शिवणी येथील सामाजिक कार्यकर्त्या कमलबाई देशमुख, माजी सरपंच नर्मदाबाई बोदरवाड, व दूर्गा महिला मंडळ समितीच्या पदाधिकारी महिला व यांच्यासह गणेश देशमुख, मनोज राठोड, पेटाजी,शेख जब्बार शेख रोशन ज्ञानेश्वर राउलवाड अब्लूल रब यरन्ना कौड व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
