HomeनांदेडPolice Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी...

Police Station Local Crime Branch ; गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) सह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात” पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL

नांदेड। गावठी पिस्टल व अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात” घेतले आहे त्याच्याजवळ अग्निशास्त्रं जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध्द अग्नीशस्त्र बाळगनाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 06/10/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, महाराणा प्रताप चौक ते हनुमानगड कमानीच्या बाजुस एक इसम त्याचे कंबरेला पिस्टल घेवुन तो परीसरात दहशत / भीती दाखविण्याचे उ‌द्देशाने अवैध्द अग्नीशस्त्र बाळगुन आहे.

यावरून पोलीस पथक सदर ठिकाणी जाऊन पोचले आणि अग्निशास्त्रं बाळगणाऱ्या त्यास ताब्यात घेउन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नावा शैलेश बलुसिंग परमार वय 26 वर्ष रा. गोपाल नगर नांदेड असे सांगीतले त्यावरुन आम्ही त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन एक अग्नीशस्त्र (पिस्टल ) विनापरवाना बेकायदेशी रित्या मिळुन आले आहे. त्याचेविरुध्द भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हादाखल करुन पुढिल कार्यवाहीस्तव पोस्टे विमानतळ त्यांच्या स्वाधीन केले आहे.

जप्त करण्यात आलेल्या अग्नीशस्त्र (पिस्टल) मालकी हक्का बाबत व खरेदी बाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांचेकडे समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन पोलीस ठाणे विमानतळ येथे त्यांचे विरुध्द भारतीय शस्त्र अधीनियम 1959 च्या कलम 3/25 काय‌द्यानुसार गुन्हा दाखल करुन, स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. सदरची कामगिरी करणाऱ्या पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments