नांदेड| महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी, नांदेड येथे दि. 07 ऑक्टोंबर 2024 सोमवार रोजी खुली महिला भजन स्पर्धा 2024-2025 पार पडली. या भजन स्पर्धेमध्ये एकुण 11 महिला भजन स्पर्धक सहभाग नोंदवून आपापले भजन सादर केले. पैकी 3 स्पर्धक निवडण्यात येऊन रोख धनादेश प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय 2 हजार, उत्तेजनार्थ एक हजार असे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र चौफाळा नांदेड, द्वितीय क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी, नांदेड, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वसमत हे विजेते ठरले असून उत्तेजनार्थ इतर सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को- ऑप. बँकेचे भारत चव्हाण हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जया हुंदाई शो रुमचे व्यवस्थापक सतीश राठी, श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टी कलामंदिर नांदेडचे अॅड. गजानन पिंपरखेडे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, बुलढाणा अर्बन बँकेचे सुरेश महाबळे, स्पर्धा परीक्षक ह.भ.प. पंढरीनाथ महाराज मुरकुटे, ह.भ.प वैजनाथ महाराज तिडके, स्वरा पंकज उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संयोजन समितीच्यावतीने सहाय्यक केंद्र संचालक साईनाथ राठोड, विलास मेंडके, सविता पांडे, विश्वनाथ साखरे, गजानन भोसीकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सर्व महिला भजन स्पर्धकांना वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते रोख धनादेश बक्षीस वाटप करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी केले तर सुत्रसंचालन विश्वनाथ साखरे व गजानन भोसीकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सहाय्यक केंद्र संचालक विलास मेंडके यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईनाथ राठोड, शेषेराव फाळके, हनुमान सवंडकर, उषा बिरादार, प्रसाद शेळके, अर्चना शिवनखेडकर, रेखा शिंदे, उज्वला गायकवाड, मंदा कोकरे, राहीबाई चकोर, अरुणा गिरी, माया वाठोरे, नामदेव तायडे, साऊंड सिस्टीमवाले संजय सोनकांबळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.