Women’s Bhajan Competition ; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नांदेड येथे महिला भजन स्पर्धा संपन्न; विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप – NNL
नांदेड| महाराष्ट्र शासन कामगार कल्याण विभागाच्या कामगार कल्याण मंडळ विभागीय गट कार्यालय लेबर कॉलनी, नांदेड येथे दि. 07 ऑक्टोंबर 2024 सोमवार रोजी खुली महिला भजन स्पर्धा 2024-2025 पार पडली. या भजन स्पर्धेमध्ये एकुण 11 महिला भजन स्पर्धक सहभाग नोंदवून आपापले भजन सादर केले. पैकी 3 स्पर्धक निवडण्यात येऊन रोख धनादेश प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार, तृतीय 2 हजार, उत्तेजनार्थ एक हजार असे बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र चौफाळा नांदेड, द्वितीय क्रमांक ललीत कला भवन लेबर कॉलनी, नांदेड, तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वसमत हे विजेते ठरले असून उत्तेजनार्थ इतर सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को- ऑप. बँकेचे भारत चव्हाण हे होते तर विचारपी...
