Friday, May 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Himayatnagar Crime : हिमायतनगरमध्ये तलवार-चाकू हल्ला; पैशांच्या वादातून सात जणांवर गुन्हा

Himayatnagar Crime : हिमायतनगरमध्ये तलवार-चाकू हल्ला; पैशांच्या वादातून सात जणांवर गुन्हा

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील उमरचौक परिसर बुधवारी अक्षरशः दहशतीच्या छायेत गेला, जेव्हा पैशांच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. तलवार व चाकूसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत करण्यात आलेल्या या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, आणखी तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाकीर हुसेन (वय 38, रा. उमरचौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उमरचौक कमानजवळ ही घटना घडली. उसने दिलेल्या पैशांवरून वाद निर्माण झाला आणि आरोपींनी “तु हमारे आदमी को पैसे मांगता क्या?” अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर सात जणांनी एकत्र येत चाकू व तलवारीने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला चढवला. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादीच्या भावावर आणि काकावरही हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तेही जखमी झाले. या प्रकरणी शेख ईलीयास, शेख एजाज,...
Nanded murder : पहाटेचा थरार; ७० तासांत ५ खून, सोनू कल्याणकर हत्येने नांदेड हादरले

Nanded murder : पहाटेचा थरार; ७० तासांत ५ खून, सोनू कल्याणकर हत्येने नांदेड हादरले

क्राईम, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) शहरात ७० तासांत पाच खून झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच सोमवारी पहाटे आणखी एक थरारक घटना घडली. श्रीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर यांची ७ ते ८ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ५.३० वाजता सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना अचानक टोळक्याने त्यांना गाठले. हल्लेखोरांनी कटर, चाकू आणि अन्य धारदार शस्त्रांनी सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर येत आहे. बहिणीचे लग्न मोडल्याच्या रागातून हा कट रचल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, संबंधित आरोपीने तुरुंगात असतानाच साथीदारांच्या माध्यमातून खुनाची योजना आखल्याची माहिती पुढे...
Yellow Alert : नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 5 रोजी ‘यलो अलर्ट

Yellow Alert : नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 5 रोजी ‘यलो अलर्ट

कृषी, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज (५ एप्रिल २०२६) एक दिवसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वीजांचा कडकडाट आणि गडगडाटी पावसामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. ⚠️ काय काळजी घ्याल? विजांचा कडकडाट सुरू असल्यास शक्यतो घरातच थांबा मोकळ्या जागेत अडकले असल्यास सखल जागेत बसून स्वतःचे संरक्षण करा घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा विजेचे खांब, लोखंडी वस्तू आण...
Yogi Sham Bharati : श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगडच्या गादीवर योगी शाम भारती

Yogi Sham Bharati : श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगडच्या गादीवर योगी शाम भारती

धार्मिक, नांदेड
नांदेड/माहूर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील पवित्र माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थानच्या महंतपदी योगी शाम भारती यांची ३१ वे महंत म्हणून निवड करण्यात आली आहे. धार्मिक परंपरेनुसार झालेल्या या निवडीमुळे दत्तसंप्रदायातील भक्तांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री दत्त शिखर संस्थान माहुर गडाचे ३१ वे महंत म्हणुन श्री श्री डॉ धनेश्वर भारती उर्फ श्याम महाराज गुरू आनंद भारती यांची तिन्ही वेळी निघालेल्या ईश्वर चिठ्ठी द्वारे निवड झालेली आहे. संस्थानाच्या गादीवर नव्याने विराजमान होताना योगी शाम भारती यांनी अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. दत्त शिखर संस्थान हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानले जाते. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा या पवित्र गादीची जबाबदारी स्वीकारणे ही मोठी आध्यात्मिक परंपरा असल्याचे मानले जाते. योगी श...
Honored : लोहा भूमीचा अभिमान! कृषी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा गौरव

Honored : लोहा भूमीचा अभिमान! कृषी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा गौरव

नांदेड, करियर
लोहा (प्रतिनिधी) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असलेले भूमिपुत्र पद्माकर मधुकरराव पाटील यांचा लोहा येथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी नगराध्यक्ष शरद पाटील पवार आणि उपनगराध्यक्ष करीम शेख यांनी श्री. पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. “आपल्या गावातील भूमिपुत्र उच्च पदावर कार्यरत असून उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार नगराध्यक्षांनी व्यक्त केले. शैक्षणिक कारकीर्द ठळक पद्माकर पाटील हे जिल्हा परिषद हायस्कूल, लोहा येथील माजी विद्यार्थी असून १९८७ च्या एसएससी परीक्षेत ते तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांनी पुढील शिक्षणही परभणीच्या कृषी विद्यापीठातून पूर्ण केले अस...
Strong Entry Police Force : मंगरूळ गावातील दोन युवकांची पोलिस दलात दमदार एन्ट्री; जिद्द आणि मेहनतीला यश

Strong Entry Police Force : मंगरूळ गावातील दोन युवकांची पोलिस दलात दमदार एन्ट्री; जिद्द आणि मेहनतीला यश

करियर, नांदेड
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील मंगरुळू गावातील दोन होतकरू युवकांनी पोलिस दलात निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ज्ञानेश्वर भरत तिगलवाड आणि आकाश रमेश रुद्रबोईणवाड या दोघांची अनुक्रमे पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर पोलिस दलात निवड झाली असून गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या या दोन्ही युवकांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता सातत्याने अभ्यास आणि शारीरिक तयारीवर भर दिला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत हेच मोठे बळ ठरले. या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण मंगरूळ गावात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. गावकऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युवकांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. “यश हे नशिबाने...
Hanuman Chalisa : माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप

Hanuman Chalisa : माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप

धार्मिक, नांदेड
लोहा| हनुमान जन्मोत्सवानिमित्त जुना लोहा शहरातील मारुती मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी उबाठा शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप करण्यात आले. हनुमान भक्त पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जन्मदिनानिमित्त मंदिर परिसरात गुलाल उधळून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले. यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण व खविसं चे उपसभापती श्याम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुतीरायाचा अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेपाच ते पावणे सात या वेळेत सूर्यकांत गुरु सनपुरकर यांनी गाथा वाचन केले. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (नांदेड दक्षिण) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या पुढाकारातून हनुमान चालीसाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी ...
Kidney specialist : किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांची कृतज्ञता ; उपस्थितांचे डोळे पाणावले

Kidney specialist : किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांची कृतज्ञता ; उपस्थितांचे डोळे पाणावले

आरोग्य, नांदेड
नांदेड| जागतिक किडनी दिनानिमित्त किडनीदान करून जीव वाचविणाऱ्या दात्यांचा तसेच त्यातून नवजीवन मिळालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा भावनिक “सत्कार सोहळा” उत्साहात पार पडला. हा आगळावेगळा “आपुलकी मेळावा” नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात किडनीदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावले. “आज आम्ही जिवंत आहोत, जग पाहू शकतो, ते फक्त किडनीदात्यांमुळे,” अशा भावना व्यक्त करताना सभागृहात उपस्थित वातावरण भावनिक झाले होते. श्री गंगा हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांत किडनीरोग तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे २९ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील हॉटेल विसावा येथे हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला श...
Accident : महाटी पुलावरून टिपर कोसळला; गोदावरीत पडून एकाचा मृत्यू, चालक बचावला

Accident : महाटी पुलावरून टिपर कोसळला; गोदावरीत पडून एकाचा मृत्यू, चालक बचावला

क्राईम, नांदेड
मुदखेड (प्रतिनिधी) तालुक्यातील महाटी-चेली मार्गावरील पुलावरून एक टिपर थेट गोदावरी नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात वाहनातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून चालक मात्र थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या टिपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात टिपरमधील एक जण नदीत पडून मृत्युमुखी पडला, तर चालकाने कसाबसा जीव वाचवला. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.दरम्यान, या परिसरात अवैध वाळू वाहतुकीसाठी टिपर मोठ्या वेगाने धावत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याची संत...
राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 150 टक्के दरवाढ द्यावी व पत्रकारावरील अन्याय थांबवावे – व्हॉईस ऑफ मीडिया

मुंबई, महाराष्ट्र
देऊळगाव राजा l राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना निर्णय आणि धोरणे पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक दृष्ट्या मोठा ताण निर्माण झाला आहे.आम्ही अनेक वेळा व्हाट्सअप मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले,आंदोलन केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. तरी राज्यातील सर्व वृत्तपत्रांना दीडशे टक्के दरवाढ देणे तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता आणि पत्रकारावर होणारे अन्याय थांबवावे करिता देऊळगाव राजा तहसील कार्यालय येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व्हॉईस ऑफ मीडिया देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की सन 2019 पासून आस्थागायत कागद,प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यब...
error: Content is protected !!