ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी -NNL
Uncategorized
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी.
राज्य निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार वि...
