लक्ष्मीकांत कहाळेकर याच्या वसतिगृह खर्चसाठी चिखलीकरांचा पुढाकार;७५ हजारांची रोख मदत -NNL
Uncategorized
लोहा| जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर हा विद्यार्थी आर्थिक बिकट परिस्थितीमुळे एमबीबीएस साठी पात्र झाला पण आर्थिक परिस्थिती तो जाऊ शकत नव्हता या बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले. शिवणकाम करणाऱ्या आईचे स्वप्न साकार झाले .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या मार्गदर्शना खाली युवा नेते प्रवीण पाटील व प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी लक्ष्मीकांत यांच्या वसतिगृह फिस उर्वरित काळात उचलण्याचे आश्वासित केले आणि प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घरी जाऊन त्यास नगरी ७५हजार रुपयांची मदत दिली .यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्तराव वाले उपस्थित होते.
जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत काहलेकर या गरीब विद्यार्थ्यांचा एमबीबीएस प्रवेश पैशा अभावी हुकणार होता. दै प्रजावाणी मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध आणि सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील यांच्या प...

