Friday, May 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Pillars of Dutt Shikhar Sansthan lost : दत्त शिखर संस्थानचे आधारस्तंभ हरपले

Pillars of Dutt Shikhar Sansthan lost : दत्त शिखर संस्थानचे आधारस्तंभ हरपले

धार्मिक, नांदेड
नांदेड/माहूर (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावरील श्री दत्त शिखर संस्थानचे प्रमुख महंत परमपूज्य मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती (मालक) यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण माहूरगड परिसरात शोककळा पसरली असून भक्तगणांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) दुपारी ३ वाजता दत्त शिखरावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. चार दशकांहून अधिक काळ गादीवर सेवा १९७८ साली धार्मिक परंपरेनुसार गादीवर विराजमान झाल्यानंतर महंत मधुसूदन भारती महाराजांनी अखंडपणे संस्थानची सेवा केली. त्यांनी दत्तसंप्रदायातील परंपरा जपत अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेला. त्यांच्या कार्यकाळात दत्त शिखर संस्थान हे केवळ धार्मिक स्थळ न राहता भक्तांसाठी श्रद्धा आणि मार्गदर्शनाचे केंद्र बनले. साधेपणातून घडवले मोठे कार्य महंत महार...
Dr. Omkar Devsarkar : हिमायतनगरचा मान उंचावला! डॉ. ओंकार देवसरकर यांना ‘MBBS’ पदवी

Dr. Omkar Devsarkar : हिमायतनगरचा मान उंचावला! डॉ. ओंकार देवसरकर यांना ‘MBBS’ पदवी

करियर, नांदेड
सिंधुदुर्ग/हिमायतनगर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (SSPM) वैद्यकीय महाविद्यालयाचा पहिला ऐतिहासिक पदवीदान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हिमायतनगर (जि. नांदेड) येथील रहिवासी डॉ. ओंकार ममता विकास पाटील देवसरकर यांना ‘MBBS’ पदवी बहाल करण्यात आली. या यशामुळे हिमायतनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या भव्य सोहळ्याला एमयूएचएस, नाशिकचे माजी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे, आमदार डॉ. निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. आमदारांकडून कौतुक हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी डॉ. ओंकार यांच्या यशाचे मनापासून अभिनंदन केले. “ग्रामीण भागातील युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश प्रेरणादायी असून, ते भविष्यात उत्कृ...
Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड/हिंगोली| नांदेड परिसरातील बालाजी भक्तांना थेट तिरुपतीला जाण्यासाठी सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही मागणी लावून धरली आहे. सध्या नांदेड–तिरुपती प्रवासासाठी थेट रेल्वेची सुविधा मर्यादित असल्याने भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी तिरुपतीला जातात. मात्र, थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार केल्यास या भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. स्थानिक नागरिक...
Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा

Support : हिंदवी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, गौतम वाठोरे | हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवस्मारकासाठी जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी मुन्ना शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, हिंदवी स्वराज्य या अराजकीय सामाजिक संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे.या संदर्भात संघटनेच्या वतीने अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये मुन्ना शिंदे यांच्या मागणीला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मारकासाठी सुरू असलेले हे आंदोलन लोकशाही मार्गाने अत्यंत महत्त्वाचे असून, आम्ही या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जाधव पाटील हरडफकर यांनी व्यक्त केले. या पाठिंबा पत्रावर तालुका अध्यक्ष योगेश पाटील खडकीकर, भीमराव मनमदे आणि अमोल शिंदे ...
Unseasonal Rains : सगरोळीत अवकाळी पावसाचा कहर; शेती व घरांचे मोठे नुकसान

Unseasonal Rains : सगरोळीत अवकाळी पावसाचा कहर; शेती व घरांचे मोठे नुकसान

कृषी, नांदेड
बिलोली (गोविंद मुंडकर ) बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे शनिवार दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अवकाळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी ग्रामस्थ यांच्या घरांवरील पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही भागात विजेचे पोल झुकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत माहिती देताना देविदास कोंडवाडे यांनी सांगितले की, या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या समोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आधीच...
Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

Chif Minister Fadnavis : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई | माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता दडलेली होती. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली होती. माहूर गड व दत्त शिखर संस्थानची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली. त्यांच्या कार्यामुळे संस्थानची ओळख अधिक व्यापक झाली होती. त्यांच्या जाण्याने केवळ संस्थेचेच नव्हे, तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ...
Train News : ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ व ‘अमानत’ अंतर्गत RPF–GRP ची कारवाई

Train News : ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ व ‘अमानत’ अंतर्गत RPF–GRP ची कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) व सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ आणि ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कारवाई करत चोरीच्या प्रयत्नातील आरोपींना ताब्यात घेतले असून, बेवारस मोबाईलही मालकाला परत देण्यात आला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानकावर CIB/नांदेडचे एएसआय अमोल वावळे यांनी GRP परभणीच्या पथकासह विशेष तपासणी मोहीम राबवली. या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील ओव्हरब्रिजजवळ प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना रंगेहात पकडण्यात आले. सुमारे सायं. ७.३० वाजता गाडी क्रमांक १७६१४ (पनवेल एक्सप्रेस) थांबलेली असताना परभणी जिल्ह्यातील अरविंद यास चोरीच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता गाडी क्रमांक १७६८७ (मराठवाडा ...
Blood Donetion : रक्तदानाची ८२ वी पायरी; दत्ता गायकवाड यांचे माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

Blood Donetion : रक्तदानाची ८२ वी पायरी; दत्ता गायकवाड यांचे माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| “माणुसकीच्या भिंतीला जेव्हा मदतीचा हात लागतो, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित होतो,” याची प्रचिती नांदेडमध्ये पुन्हा एकदा आली. येथील ‘श्री हजुर साहेब ब्लड सेंटर’मध्ये दत्ता गायकवाड यांनी आयुष्यातील तब्बल ८२ व्या वेळेस रक्तदान करत सेवाभावाचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या चिमुकल्या ऋतुजा गायकवाड या बालिकेला ‘B+’ रक्ताची तातडीची गरज असल्याची माहिती मिळताच, कोणताही विलंब न करता गायकवाड यांनी रक्तपेढीकडे धाव घेतली. त्यांच्या या तात्काळ मदतीमुळे त्या निरागस जीवाला नवसंजीवनी मिळाली. लहान मुलीच्या चेहऱ्यावर परतलेली आशा आणि आनंद पाहून उपस्थितांनाही भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. हे कार्य केवळ वैयक्तिक मर्यादेत न राहता ‘श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप’च्या माध्यमातून व्यापक स्तरावर राबवले जात आहे. थॅलेसेमियाग्रस्त बालकांना नियमित रक्तपुरवठ...
Passed away : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना श्रद्धांजली

Passed away : दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज यांना श्रद्धांजली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/माहूर | नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखद ठरली आहे. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनीही आपल्या भावना व्यक्त करत महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले आहे की, “माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही ...
Protest for Shivaji statue : हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरती माघार

Protest for Shivaji statue : हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरती माघार

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून हिमायतनगरात आंदोलन चांगलेच पेटले असून, प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाच दिवस चाललेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर तात्पुरती माघार घेतली असली, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास 21 एप्रिलपासून पुन्हा आमरण उपोषण छेडण्याचा आणि 22 एप्रिल रोजी संपूर्ण ‘गाव बंद’ करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष माधव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 31 मार्चपासून सुरू असलेले उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत होते. शहरातील वातावरण चिघळत असताना अखेर पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करावी लागली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपंचायतीने पुतळ्यासाठी पाच जागांचे लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुर...
error: Content is protected !!