Sunday, June 28

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
नांदेडमध्ये शिक्षण सेवकांचा कॅण्डल मार्च; मागण्यांकडे वेधले लक्ष

नांदेडमध्ये शिक्षण सेवकांचा कॅण्डल मार्च; मागण्यांकडे वेधले लक्ष

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|  राज्यातील अकाली निधन झालेल्या शिक्षण सेवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण सेवक कृती समिती, नांदेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी महात्मा फुले चौकात कॅण्डल मार्च काढण्यात आला. कॅण्डल मार्चपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी शिक्षण सेवकांनी विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवत शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे काम करूनही सेवा कालावधीत कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शिक्षण सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण किंवा नोकरीची हमी मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मयतांच्या वारसांना नोकरी देऊन आर्थिक मदत करावी, तसेच शिक्षण सेवकांना सर...
Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| शहराजवळील हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय धान्य गोदामातून कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक (MH26-7776) सिरपल्ली–सिरंजनी मार्गावरून येणाऱ्या दुचाकीला (MH29-AZ 4538) एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०, रा. सिरपल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकून पडल्याचे दृश्य घटनास्थळी दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती ग...
अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

क्राईम
नांदेड| देगलूर स्थित मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची 26 ऑगस्ट 2025 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने तपासणीमध्ये डॉक्टरांच्या चिठठीशिवाय औषधाची विक्री करणे, परवाने दर्शनीभागी प्रदर्शित न करणे,  Tramadol युक्त औषधांच्या संगणकामध्ये नमूद साठा व औषधी दुकानामध्ये असलेला प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळून येणे, भागीदारी संपुष्टात आल्याने नियमाप्रमाणे कार्यालयाकडे नवीन परवाने प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज न करणे यासारखे गंभीर मुददे आढळून आलेले होते. त्याअनुषंगाने पेढीस कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येवून पेढीचे परवाने 21 डिसेंबर 2025 पासून रदद करण्यात आले होते. मे. डी. ॲण्ड जी. फार्मा, देगलूर ही औषधी पेढी भागीदारमध्ये असून शशिकांत माणिकराव गरूडकर व गजानन प्रकाश ढगे हे भागीदार आहेत.  त्यांनी परवाने रदद आदेशास मंत्री महोदय,अन्न व औषध प्रशासन, यांचेकडून स्थगिती आदेश प्राप्त करून घे...
डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Driven to End Malaria : Now We Can.Now We Must मराठी भाषांतर हिवताप...
एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र
धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा मुंबई| राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी...
हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

कृषी
हदगाव (गौतम वाठोरे) तालुक्यात व शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांवर अधिकृत माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाने केली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या हदगाव तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेले नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रस्ते कामे कोणत्या योजनेतून सुरू आहेत, अंदाजपत्रक किती आहे, कामाचा कालावधी किती आहे तसेच संबंधित कंत्राटदार कोण आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती फलक नसल्यामुळे कामाच्या दर्जा आणि निधीच्या वापराबाबत जनतेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण हो...
तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव हिमायतगर येथील महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी स्वतःला जनतेचे मालक समजून वागत असतील तर त्यांनी तो भ्रम काढून टाकावा. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे विसरू नका,अशा कडक शब्दांत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव येथे शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एमएसईबी (MSEB) प्रशासनाचे कान टोचले. बोरगाव येथील दुर्दैवी घटनेला अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खासदारांनी संताप व्यक्त केला. बोरगाव घटनेवरून बैठकीत रणकंदन झाला काही दिवसांपूर्वी बोरगाव येथे वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत खासदारांनी हदगाव-हिमायतनगर विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतून प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. घटनेल...
Hunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

Hunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने थेट लढाईचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनावर आरोप करत सांगितले की, “फेब्रुवारी व मार्च महिन्यात उपोषण केल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत जागा देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही सरळसरळ फसवणूक आहे असे मुन्नाभाऊ शिंदे यांनी म्हंटले आहे.” २१ एप्रिलपासून उपोषण - या पार्श्वभूमीवर, २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रशासन...
समता, बंधूभाव व समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर आजही प्रेरणादायी – विरभद्र एजगे

समता, बंधूभाव व समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर आजही प्रेरणादायी – विरभद्र एजगे

करियर
पेनूर| समता, बंधूभाव आणि समाजसुधारणेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत शालेय समिती सदस्य तथा पत्रकार विरभद्र एजगे यांनी व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर हे १२व्या शतकातील महान भारतीय तत्त्ववेत्ता, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, लोकशाही मूल्ये आणि जातिभेद निर्मूलनासाठी मोठे कार्य केले. ‘काय कायकैवे कैलास’ (काम हीच पूजा) हा त्यांचा संदेश समाजाला दिशा देणारा ठरला. तसेच ‘अनुभव मंडप’ स्थापनेद्वारे त्यांनी समाजात विचारमंथनाची परंपरा निर्माण केली. जिल्हा परिषद हायस्कूल, पेनूर येथे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बसूआप्पा धोंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स...
Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातील रेल्वे स्थानकावर कोट्यावधीच्या निधीतून सुरु असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटींमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकावरील दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर अद्याप रेल्वे कोच पोझिशन दर्शविणारे डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी थांबणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक नंबर प्लॅटफॉर्मवर जुन्या बांधकामाला नवीन स्वरूप देण्यात आल्याचे दिसून येते, तर दुरुस्तीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार आहे. छतामधून पाणी गळत असल्याचेही ...
error: Content is protected !!