HomeनांदेडHanuman Chalisa : माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप

Hanuman Chalisa : माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप

लोहा| हनुमान जन्मोत्सवानिमित्त जुना लोहा शहरातील मारुती मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी उबाठा शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते हनुमान चालीसाचे वाटप करण्यात आले.

हनुमान भक्त पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जन्मदिनानिमित्त मंदिर परिसरात गुलाल उधळून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले.

यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण व खविसं चे उपसभापती श्याम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुतीरायाचा अभिषेक करण्यात आला. पहाटे साडेपाच ते पावणे सात या वेळेत सूर्यकांत गुरु सनपुरकर यांनी गाथा वाचन केले. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (नांदेड दक्षिण) जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार यांच्या पुढाकारातून हनुमान चालीसाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, गोपाळ सावकार कवठेकर, नामदेव पवार, बालाजी अंकुलवार, विठ्ठल चव्हाण, बी.वाय. चव्हाण, काशिनाथ शिरशीकर, किसन काळे, आप्पाराव पवार, लक्ष्मण कांजले, संजय कहाळेकर, हनुमंत पांचाळ, गजानन दांगटे, बबरू पवार, गंगाधर पवार, मोहन मुंडे, गोविंद पवार, सूर्यकांत चव्हाण, दीपक चव्हाण, ऋतिक पवार यांच्यासह मोठ्या संख्येने मारुतीरायाचे भक्त उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments