Khadki murder case : खडकी येथील शेख बाबु यांच्या खुनातील अन्य फरार आरोपीना अटक करून न्याय देण्याची मागणी -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणार मौजे खडकी बा. येथे दिनांक 25/05/2009 रोजी शेख बाबु शेख करीम यांचा येथीलच काही पारधी समाजातील लोकांनी खुलेआम खुन केला होता. आजपर्यंत सदर गुन्ह्यातील इतर सहा आरोपींना अटक झाली नसुन, त्यांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करावी आणि पेरोल रजेवर येऊन फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्याय द्यावा अशी मागणी दिनांक ०५ रोजी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शेख जीलानी शेख बाबा यांनी केली आहे.

अर्जदार शेख जीलानी शेख बाबा, यय 45 वर्ष, धंदा शेती, रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मला दोन भाऊ असुन नामे राख सलीम शेख बाबा, शेख कलीम शंख बावा व तीन बहीणी आहेत. माझे वडील रोख बाबु शे. करीम यांचा दिनांक 25/05/2009 रोजी पारधी समाजातील काही गावगुंडांती त्यांचा खुलेआम खुन करुन ठार मारले होते. त्यानंतर सदरील प्रकरण हे अतिशय संवेदनशिल झाल्यानंतर त्यातील एका आरोपी कालीया रघुनाथ शिगाडे या फक्त एका आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यास सम्माननिय न्यायालयामार्फत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर काही काळानंतर सदर आरोपीला पॅरोलवर रजा दिल्यानंतर सदर आरोपी आजरोजी फरार आहे.

यातील ईतर सहा आरोपी रघुनाथ रामसिंग सिंगाडे, अविनाश रघुनाथ शिगाड, महिक रघुनाथ शिंगाडे, पिट रघुनाथ शिंगाडे, हरी गुलाब चव्हाण, नंद रामसिंग शिगाड या आरोपी विरुद्ध स्थानिक व जिल्हा पोलीसांनी सदर प्रकरणात सदर आरोपी विरुद्ध कोणताही तपास केलेला नाही किंवा सदर आरोपीला आजपर्यंत अटक केलेली नाही. सदर आरोपी देखील फरार आहेत. सदरील प्रकरणात वारंवार सर्व आरोपीना अटक करा म्हणुन माझ्या कुटुंबाकडून विनंती अर्ज, निवेदने दिले होते. परंतु आजपर्यंत सदर आरोपींना आपल्या कार्यालयाकडुन किंवा पोलीस स्टेशन मार्फत अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपी हे आजतागायत खुलेआम मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असतांना सुद्धा सदर सहा आरोपी हे मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्या वरील आरोपीना कायद्याचे भय राहिले नाही, अशातच ते इतर कोणताही गुन्हा करुन समजत तेढ निर्माण कण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण ज्या वेळेस पोलीस अधिक्षक माणुन कर्तव्यावर होतात तेव्हा मी आपणाकडे सदर प्रकरणाबाबत सखोल तपास करा व सदर मोकाट फिरणा-या आरोपींना तात्काळ अटक करा. म्हणून विनंती अर्ज दिला तेव्हा आपण मला असे वचन (शब्द) दिला होता की, तुम्ही काळजी करु नका सदर आरोपीचा आम्ही शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक कर असे वचन दिला होता. परंतु आजपर्यंत सदर आरोपीना आपल्या कार्यालयामार्फत अट्रक झालेली नाही. सदर आरोपी व आरोपीच्या घरचे लोक हे मला, माझ्या कुटुंबातील व्यक्तीना व सदर प्रकरणातील साक्षीदार नामे वसंत आमरसिंग राठोड, शेख अकबर शेख नजीर यांना वारंवार धमकी देऊन साक्षीदारावर दबाव आणून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे.

सदर आरोपीच्या घरच्या व्यक्ती साक्षीदाराला म्हणत आहेत की, तुम्ही माझ्या मुल्लाथ्या विरुद्ध का साक्ष दिलीत, माझ्या मुलाला सदर प्रकरणात शिक्षा झाली आहे, आम्ही तर तुम्हाला खतम करतो असे म्हणून जिथे भेटेल तेथे जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. त्यामुळे वरील सहाही आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांकडून मला, माझ्या कुटुंबातील व्यक्तीना व साक्षीदारांच्या जिवीतास धोका आहे. जर माझे, माझ्या कुटुंबाचे व साक्षीदाराच्या जिवीतास काही हानी झाली तर त्यास सर्वस्वी जबाबदारी ही वरील सहाही आरोपी व त्यांच्या कुटुंबीय राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वरील सर्व आरोपीना अटक करून मला न्याय द्यावा असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर अर्जदार शेख जिलानी शेख बाबा, रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर जि. नांदेड मो.नं. ८९७५३७७९७३ यांची स्वाक्षरी आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button