नांदेडक्राईम

Balirampur ; बळीरामपुर दारूबंदी दुकान स्थलांतरित करण्यासाठी रस्ता रोको, अन्यथा आत्मदहन – सरपंच सौ.रेणुका पांचाळ

नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावरील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,1 एप्रिल रोजी बळीरामपुर चौक येथे सरपंच सौ.रेणुका पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य‌,महिला, युवक , नागरिक यांनी सहभागी होत रास्ता रोको आंदोलन केल्याने जाणारी येणारी वाहतूक खोळंबली,या वेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता, अखेर 10 एप्रिल पर्यंत देशी दारू दुकान स्थलांतरित न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच सौ.रेणुका पांचाळ यांनी दिला आहे.

बळी रामपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावरील देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यासाठी गेल्या वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, यासंबंधी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभेत स्थलांतरीत बाबत ठराव घेण्यात आला होता,या बाबत निवेदन प्रती जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक,अधिक्षक उत्पादन शुल्क नांदेड, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या होत्या व 1 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मागणी दखल न झाल्याने 1 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता औधोगिक वसाहतीतील मुख्य मार्गावर सरपंच सौ.रेणुका इंद्रजित पांचाळ , ऊपसरपंच नागेश वाघमारे, सदस्य रविंद्र भंडारे, किशन‌ गव्हाणे, आरती रवी डोईबळे,अनिता तेलंग, साहेबराव चित्रे, नरसिंग गडपवार, संदीप डुमणे, ज्ञानोबा दासरवार, यांच्या सह माजी सरपंच नागोराव अंबटवार, सरपंच प्रतिनिधी इंद्रजित पांचाळ, गावातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सह पोलीस अंमलदार सुर्यवंशी, होमगार्ड यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

रास्ता रोको आंदोलन मुळे जाणारी येणारी वाहतूक खोळंबली होती, स्थलांतर बाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने 10 एप्रिल रोजी सरपंच सौ.रेणुका पांचाळ यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

रास्ता रोको आंदोलन झाल्या नंतर उत्पादन शुल्क कार्यालय नांदेड यांच्या वतीने सरपंच सौ.पांचाळ यांना पत्र देऊन संबंधित स्थलांतर त्रुटी पूर्ण होताच देशी दारू दुकान स्थलांतरित करण्यात येईल असे पत्र दिले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button