occasion of Ashadhi Ekadashi, a program called Gajar Hari will be organized नांदेड| आषाढी एकादशीच्यानिमित्ताने कलांगन प्रतिष्ठानच्या वतीने गजर हरी नामाचा -आषाढी महोत्सवाचे आयोजन दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत विठ्ठल माऊलीच्या भक्तीगितांची सुरेल मैफल नांदेडकरांसमोर सादर करणार आहेत.


आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित गजर हरी नामाचा या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती निवेदन अॅड. गजानन पिंपरखेडे यांची असून पिंपरखेडे यांनी राज्यभरात आपल्या वेगळ्या वैशिष्टयासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करतांना उत्कृष्ट निवेदन ही केले आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे असून संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे आहे. कार्यक्रमाचे निर्मितीसहाय्य रमेश मेगदे यांचे असून ध्वनी व्यवस्था संतोष गट्टानी यांचे आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्जकलांवत तसेच नांदेडचे स्थानिक कलावंत विठु माऊलीच्या भक्ती गितांचा श्रवणीय कार्यक्रम सादर करणार आहेत. यात पुण्याचे दिग्ज कलावंत चैतन्य कुलकर्णी, पुण्याची प्रसिध्द गायीका सौ. असावरी जोशी, नांदेडचे प्रख्यात गायक विलास गारोळे व नांदेडची उदयोन्मुख गायीका सौ. रागीणी जोशी यांच्यासह अन्य कलावंत नांदेडकरांना विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुनील वेदपाठक व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष उपस्थितांमध्ये डॉ. राहुल पटणे, प्रा. प्रभाकर उदगीरे, बालाजी पांडागळे, रमेश मिरजकर, अनिल शेटकार, राजेंद्र हुरणे यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमासाठी संगीत साथ डॉ. प्रमोद देशपांडे, राजु जगधने, पंकज शिरभाते, तुषार साळवी, स्वपनील धुळे, विश्वेश्वर जोशी यांची असणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड यांचे विशेष सहकार्य असणार आहे. कलांगण प्रतिष्ठान ने यापुर्वी देखिल नांदेडकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी दिली असून गजर हरी नामाचा ही आगळी वेगळी भक्तीगितांची अनोखी मैफल नांदेडकरांना अनुभवता येणार आहे. कुसूम सभागृहात ४ जुलै रोजी सांयकाळी ७ वाजता होणार्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी सहभागी होवून भक्तीगितांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश मेगदे, नंदकुमार दुधेवाड, शंतनु डोईफोडे, गोवर्धन बियाणी, रामशेट्टी तुप्तेवार, बापु दासरी, माधवराव पटणे, बालासाहेब मादसवाड, रमाकांत गंदेवार, प्रणव मनुरवार, विजय डुमणे, लक्ष्मीकांत बंडेवार, पुरूषोतम देशपांडे, स. जगजिवनसिंघ रिसालदार, सचिन कोटलवार, संतोष पाळेकर, इंजि. नारायण आकमार, इंजि. रमेश सुरकुटवार, डॉ. प्रसाद जोशी, अॅड. उर्मिला हटडे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमासाठी महिला समिती देखिल कलांगण प्रतिष्ठाणने स्थापन केली आहे.