नांदेड| सध्या सोशल मीडियावरून व्हाट्सअप, टेलिग्राम अँपच्या माध्यमातून तरुण-तरुणीचे लग्न जुळत आहेत Mh पद्मशाली वधु-वर मिलन या वॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप वर 10 हजारच्या वर तरुण-तरुणी यांचे बायोडाटा लग्न करू इच्छिणाऱ्या त्यांच्या पालकांना पाहायला मिळतील.लग्न करिता तरुण तरुणींनी आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवल्यास लग्न लवकर जुळेल असा विश्वास संतोष कोंकलवारांनी व्यक्त केला.
वीस वर्षे पूर्वी वधु-वर मेळावा भरविले असता केवळ 10 ते 12 मुलांची यादी मिळत असे आज 200 ते 300 मुलांची यादी वधू वर परिचय मेळावा करिता मिळत आहे. परंतु आज पूर्वीपेक्षा मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत अशी चिंता संतोष कोंकलवारांनी व्यक्त केली. ‘लग्ना मुळे स्त्री पुरुष हे दोन जीव एकत्र होत असतात वेगवेगळ्या अश्या दोन कुटुंबांमध्ये लग्न निमित्त स्नेह वाढतो. हा उद्देश कोंकलवार यांनी डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक कार्य म्हणून वॉट्सअप आणि टेलिग्राम सोशल मीडियाचा योग्य वापर करून लग्न जुळवण्याचे कार्य करीत आहेत.त्यांनी स्थापन केलेल्या Mh ग्रुप ला संपूर्ण भारतातून व देश -विदेशातून खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे.


असे Mh पद्मशाली वधू-वर मिलन या ग्रुपची 2016 साली स्थापना करणारे ग्रुपचे मुख्य संस्थापक एडमिन संतोष कोंकलवार यांनी सांगितले Mh पद्मशाली ग्रुप च्या माध्यमातून आत्तापर्यंत शेकडो वर वधु-वरांचे लग्न जमले आहे. लग्न करणे व्यवसाय नसून हिंदू संस्कृतीत लग्न व्यवस्थेला अत्यंत महत्त्व असून ते सर्वात पवित्र असे कार्य आहे. जीवनभर जोडीदाराला आपल्या सुखदुःखात संसारात साथ देऊन आपले जीवन व्यतीत करणे तसेच कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचा देखील लग्नाचा अर्थ आहे.सध्या बहुतेक सुशिक्षित मुली ‘स्थळ पाहताना स्वतःचं घर पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त पगार पाहिजे हा लग्नाविषयी दृष्टीकोन डोळ्यासमोर असतो सदर दृष्टिकोन बदलने गरजेचे आहे. हा महत्वाचा संदेश संतोष कोंकलवारांनी दिला.

पालकांनी आपल्या पाल्यांच्या लग्नाकरिता कर्ज काढुन आपल्या मुला- मुलीचे लग्न करु नका याचे कारण असे की, लग्नाला उपस्थित राहून वधू-वराला आशीर्वाद देणारे नातेवाईक , मित्रमंडळी, समाजातील बांधव आपली प्रशंसा करून फक्त येवढेच म्हणून जातील लग्न अतिशय थाटामाटा केले परंतु अशी प्रशंसा करणारे लोक आपल्या मुलां- मुलींच्या लग्नानिमित्त झालेले कर्ज फेडणार नाही हे लग्न करीता कर्ज काढणाऱ्यांनी गंभीरपणे विचार करावा. असा मौलिक सल्ला संतोष कोंकलवार यांनी दिला.

सामाजिक विवाह मेळावा मध्ये लग्न करा विवाह मेळाव्यात हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटाने होत असते. समाजात आज देखील लग्नात वधू पक्षाकडून सोने- नाणे, भेटवस्तू , रोख रक्कम या स्वरूपात हुंडा घेणे ही अनिष्ट प्रथा अजून देखील पाहायला मिळते. हुंड्याच्या विरोधात मुलींनी त्यांच्या पालकांनी पुढे यावे अशी अपेक्षा कोंकलवारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्यात नांदेड,पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, विदर्भात, नागपूर चंद्रपूर हिंगणघाट, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा सिकंद्राबाद शहरात पद्मशाली समाजाच्या वतीने सामूहिक परिचय मेळावा आणि विवाह सोहळा आयोजित करतात. नांदेड येथे 16 मे रोजी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 12 जोडपे विवाहबद्ध झालेत. समाज बांधवांनी प्रचलित विवाह बद्दल सामाजिक दृष्टिकोन बदलणे ही काळाची गरज असून विवाह करिता भरमसाठ खर्च करून कर्जबाजारी होणे यापेक्षा तरुण-तरुणांनी लग्नाचा खर्च वाचून ते पैसे आपल्या भविष्याकरिता ठेवण्यासाठी सामाजिक विवाह सारखा चांगला पर्याय असू शकत नाही असे विचार कोंकलवारांनी मांडले.
Mh पद्मशाली वधु-वर मिलनचे संस्थापक संतोष कोंकलवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, त्यांचे सहकारी ऍडमिन रमेश दासरी,भुमाजी मामीडवार,अमोल बोदुल, बोगा प्रकाश, सत्यजीत टिप्रेसवार, लक्ष्मणराव चेन्नावार, रेड्डी अण्णा बोधनवार,नाना मादास,श्रीनिवास भिमनाथ,माजी प्रा. विजय उपलचवार, सुनील मच्छेवार, शिवा क्यातमवार, प्रकाश दासरवार, प्रभाकर दासरवार,नागभूषण येंबडवार,सुरेश अलचेट्टीवार,कन्नू गंगुल, संजय टिप्रसवार, प्रविण जक्कलवार, श्रीनिवास मंचेवार सौ.भारतीताई राव यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने पुढच्या विवाह करिता जास्तीत जास्त विवाह नोंदणी करणार असा विश्वास – Mh पद्मशाली वधु-वर मिलनचे संस्थापक संतोष कोंकलवार यांनी व्यक्त केला. त्यांनी राज्यात विवाह संस्थांच्या नावे मोबाईल वरून फसवणूक कॉल बाबत वधू-वरांच्या पालकांना जागृत राहण्यास सांगितले.