Padmashali Vadhu-Var : MH पद्मशाली वधु-वर मिलन ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियावर होताहेत अनेकांची तरुण-तरुणींचे लग्न
नांदेड| सध्या सोशल मीडियावरून व्हाट्सअप, टेलिग्राम अँपच्या माध्यमातून तरुण-तरुणीचे लग्न जुळत आहेत Mh पद्मशाली वधु-वर मिलन या वॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप वर 10 हजारच्या वर तरुण-तरुणी यांचे बायोडाटा लग्न करू इच्छिणाऱ्या त्यांच्या पालकांना पाहायला मिळतील.लग्न करिता तरुण तरुणींनी आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवल्यास लग्न लवकर जुळेल असा विश्वास संतोष कोंकलवारांनी व्यक्त केला.
वीस वर्षे पूर्वी वधु-वर मेळावा भरविले असता केवळ 10 ते 12 मुलांची यादी मिळत असे आज 200 ते 300 मुलांची यादी वधू वर परिचय मेळावा करिता मिळत आहे. परंतु आज पूर्वीपेक्षा मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत अशी चिंता संतोष कोंकलवारांनी व्यक्त केली. 'लग्ना मुळे स्त्री पुरुष हे दोन जीव एकत्र होत असतात वेगवेगळ्या अश्या दोन कुटुंबांमध्ये लग्न निमित्त स्नेह वाढतो. हा उद्देश कोंकलवार यांनी डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक कार्य म्हणून व...
