बिलोली। बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून गाड्या चोरी करणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील देशमुख नगर येथील घरा समोर हिरो होंडा सप्टेंबर प्लस एम.एच 26 ए.बी 6998 ही मोटार सायकल 26नोव्हेंबर च्या मध्यरात्री चोरीला केली.
बिलोली शहर आणि परिसरात मटका आणि जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सिंधी,दारू सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होतानाचे चित्र दिसून येते. 26 नोव्हेंबर च्या रात्री चोरीला गेलेल्या मोटरसायकल पूर्वी दि.25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 1:30 च्या सुमारास भंडारे नामक एका व्यक्तीने महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे पन्नास हजार रुपये भरण्यासाठी गेले असता, बॅकते 50 हजार भरण्यासाठी पॅनकार्ड लागेल म्हणाले भंडारे रा.बामणी हे पॅनकार्ड साठी सेतू कडे पायी चालत अस्तांना अनोळखी अटो व त्या मधील व्यक्तीने अॉटोत बसुन घेतले.
थोडं समोर जाऊन लगेच उतरवीले. नंतर खिशात ठेवले रुपये चोरी झाल्याचे लक्षात आले . तीसरी घटना बिलोली ते नरसी राष्ट्रीय महामार्गावर पहाटे युवक जॉगिंग करतांना दुचाकी वरुन दो व्यक्ती जवळ येऊन 10 रुपये आहे का?असे विचाले व हातातील Vivo कंपनीची मोबाईल चाकु दाखवुन हिस्काऊन घेतले.
बिलोली शहर परिसरातुन भागातून गेल्या वर्षभरात अनेक , दुकानातुन लहान चोरी ,मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या.अनेक गाड्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून बिलोली शहरात गुन्हेगारीला उत येत आहे. मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे . मोटर सायकल चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत.
या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावर असो वा इमारतीच्या आवारात समोरील निशाण्यावर असलेली गाडी ते सहजासहजी उडवत आहेत. बिलोली शहरात, परिसरात चोरीच्या घटना घडूनही बिलोली पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. अशी तक्रार मोटर सायकल चोरीला गेलेल्या व्यक्तींनी केली आहे.या चोरीच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे नाही, गेल्या वाहनांचा शोध देखील घेतले जात नाही, गेल्या वर्षी चोरी झालेल्या वाहने देखील भेटले नाही. पोलीसांना वाहन चोरटे सापडत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वाहन चोरीची घटना झाल्यानंतर नोंद घेण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात आले .