HomeनांदेडElection decision officer Aruna Sangewar ; लोहा विधानसभा मतदारसंघ झालेले प्रत्यक्ष मतदान...

Election decision officer Aruna Sangewar ; लोहा विधानसभा मतदारसंघ झालेले प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी मध्ये तफावत नाही निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार – NNL

लोहा l लोहा विधानसभा मतदार संघात ईव्हीएम वर प्रत्यक्ष झालेले मतदान व झालेली मतमोजणी यात कोणतीही तफावत नाही असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी स्पष्ट केले लोहा विधानसभा मतदार संघाचा मतमोजणी नंतर निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यात नमूद केले आहे की

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत 88-लोहा विधानसभा मतदारसंघात ३३८ मतदान केंद्र व ३ लक्ष १हजार ६५० मतदार होते-20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे प्रक्रिया पार पडली.२ लक्ष २६ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला मतदारानी सर्व 338 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान बजावले मतदान झाल्‍या नंतर प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्र निहाय आकडेवारीत मानवी चुक होऊन मतदान केंद्र क्रमांक 319 मध्‍ये प्रत्‍यक्ष मतदान यंत्रावर झालेले मतदान 675 आहे पण 521 असा मतदानाचा आकडा प्रसिध्‍द झाले होता . मतदान यंत्रासोबत संबंधित मतदान केंद्राध्‍यक्ष यांचा नमुना 17-c (नोंदविलेल्‍या मतांचा हिशेब) मध्‍ये एकुण 675 मतदान झाल्‍याचे नोंद आहे.

मतमोजणी दरम्‍यान नमुना 17-c भाग-एक मध्‍ये नोंदविलेले मतदान व नियंत्रण युनिट (मतदान यंत्र) मधील मतदान 675 असुन ते जुळलेले आहे. त्‍यामुळे 88-लोहा विधानसभा मतदारसंघात EVM यंत्रावर झालेले एकुण मतदान (नोटासह) 2लक्ष 26हजार 991 व मतमोजणी मध्‍ये उमेदवारानिहाय झालेली मतमोजणी (नोटासह) 2लक्ष 26हजार 991 एवढ्या मतांची झालेली आहे.

त्‍यामुळे -लोहा विधानसभा मतदारसंघात प्रत्‍यक्ष मतदान केंद्रावर झालेले एकुण मतदान व झालेली मतमोजणी यामध्‍ये मतदानाची कोणतीही तफावत नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments