नांदेड| समाज कल्याण कार्यालय, विधीसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा कार्यक्रम नियोजन भवन येथे साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व फेस्कॉमचे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्धघाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.