Homeआरोग्यnot receiving food bill : पेपर एग्जॅक्टरच्या जेवणाचे बिल न मिळाल्याने उपोषणाचा...

not receiving food bill : पेपर एग्जॅक्टरच्या जेवणाचे बिल न मिळाल्याने उपोषणाचा इशारा

हिमायतनगर| पेपर एग्जॅक्टरच्या प्रशिक्षणादरम्यान पुरविण्यात आलेल्या जेवणाचे बिल अद्याप न मिळाल्याने येथील सय्यद सादिक सय्यद रहीम यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माहितीनुसार, पेपर एग्जॅक्टरचे एकूण पाच बॅचचे प्रशिक्षण पार पडले होते. यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन बॅच, तर चिंचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन बॅचचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व प्रशिक्षण सत्रांसाठी जेवणाची जबाबदारी सय्यद सादिक सय्यद रहीम यांनी पार पाडली होती.

मात्र, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या जेवणाचे बिल अद्याप अदा करण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रहीम यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांच्या मुलीचा विवाह पुढील महिन्यात आहे. अशा परिस्थितीत बिल थकीत राहिल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ थकीत बिल अदा करावे, अन्यथा कुटुंबासह तालुका आरोग्य कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments