Thursday, May 14

Gutkha smuggling car seized : गुटख्याची तस्करी करणारी गाडी किनवट पोलिसाच्या ताब्यात 20 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त; आरोपी मात्र फरार -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| दिनांक 5- 9- 2024 च्या रात्री शहरात पोलिस रात्रीची गस्त घालत असताना एक बोलेरो पिकप वाहनाने तंबाखू युक्त गुटखा भरून राष्ट्रीय महामार्ग रोडणे जात असताना आंबेडकर चौक किनवट येथे येताच पोलिसांनी सदर वाहनाची चौकशी केली अन त्यात चक्क 13 लाख 38 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. वाहनाच्या किंमत सहित वीस लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल किनवट पोलीसांनी जप्त केला. सदर गुटखा हा हिमायतनगर ते सारखणी येथे जात होता अशी माहिती समोर येत आहे. वाहन मुद्देमाल जप्त केले परंतु गाडी चालक फरार कसा झाला ? सारखानीतील मीडियाच्या नावाखाली हा अवैध्य गुटखा तस्करी करणारा आणि त्याचा साथीदार कोण, याची कसून चौकशी होणे गरजेचे असून आता पुन्हा एकदा सारखणीच गुटखा तस्करांचे केंद्रबिंदू आहे हे लवकरच पोलिसांनी सदर तस्करांचा शोध घेतल्यानंतर निष्पन्न होणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्ताचे की, दिनांक 5-9 च्या रात्री खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की, राज्य महामार्गाने एक पिकप बोलेरो वाहन येत असून त्यात गुटखा भरलेला आहे. सदर माहिती मिळताच पोलिसांनी पाळत ठेवून सदर वाहन तपासणी केली.त्यात हा अवैध्य विना परवाना व शासनाने बंदी घातलेला अनेक नमुन्याचा गुटखा आढळून आला. जेव्हा एवढा मोठा गुटख्याचा साठा घेऊन जात असलेल्या या वाहनाचा चालक शेख वसीम शेख रजाक फरार झाला. आणि तो कसा फरार झाला हे संशयास्पद आहे. मीडियाच्या नावाखाली पोलिसांशी हात मिळवणी करत हा अवैध्य गोरख धंदा करणारा व त्याचा साथीदार हे मुख्य दोन गुटखा तस्कर कोण? हे खरे आरोपी असून त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करावी केवळ ड्रायव्हर वरच कार्यवाही झाल्याने हा प्रकार थांबणार नाही.

IMG 20240906 WA0086 Gutkha smuggling car seized : गुटख्याची तस्करी करणारी गाडी किनवट पोलिसाच्या ताब्यात 20 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त; आरोपी मात्र फरार -NNL

मुख्य चोर सोडून संन्यासाला फासी असा प्रकार होता कामा नये. सारखणी हेच ठिकाण अवैध धंद्याचे केंद्रबिंदू असल्याचे पुन्हा एकदा निपक्ष चौकशी झाल्यास निष्पन्न होणार आहे.सारखणी येथील दोन गुटखा तस्करांचा मोठा अवैध व्यवसाय असून तेथून सर्वत्र गुटखा वितरित करण्यात येतो. असे अनेकदा वृत्तपत्रात वृत्तही प्रकाशित झाले आहेत. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक चांद यांचे हे खूप मोठं धाडस म्हणावे लागेल. त्याच्या फिर्यादीवरून याबाबत पोलीस स्टेशन किनवट येथे गुरं 272 /2024 कलम 132, 223, 275 भानास सह कलम अन्न व सुरक्षा कायदा 2006 ची कलम 26 (2)(1) 26 (2)( 4)27 (3)(1) 30 (2)सहकलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आहे हे खरे आहे. परंतु हेच गुन्हे मूळ गुटका तस्करावर दाखल व्हावे अशी मागणी आता वर्तुळात होत आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी यात स्वतः लक्ष घालून मुख्य तस्करांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट रामकृष्ण मळगणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक चांद, पोलीस कॉन्स्टेबल कुडमते, होमगार्ड त्रिमनवार, राठोड,उपलेंचवार, एडके, शेख यांनी मोलाची कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!