किनवट, परमेश्वर पेशवे| शहरातुन पैनगंगा अभयारण्यकडे जाणा-या मार्गावर मार्गावर बुधवार दि.२२ रोजी सकाळी दुचाकी व प्रवासी वाहतुक करणा-या ऑटो यांच्यात झालेल्या अपघातात एक सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी साहेबराव गंगाराम बटुर यांचा जागीच मृत्यु (car and a two-wheeler accident) झाला तर तीघे गंभीर जखमी झाले आहे.

गोकुंदा ते किनवट असा प्रवास करत असलेला ऑटो व एक दुचाकी ज्याचा चालक शेख अहेमद शेख कमाल खान रा. किनवट हे सुरळीत प्रवास करत असतांना एका धुम स्टाईल दुचाकी चालवणा-या बजाज पल्सर या कंपनीच्या अज्ञात दुचाकी चालकाने दोघांना सुसाट वेगात कट मारल्याने ऑटोचाकल व शेख अहेमद या दुचाकी चालकांचा त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटोने दुचाकी चालकास जोरदार धडक मारली यात सदर ऑटो पलटी झाला ऑटो मधील प्रवासी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव बटुर यांचा जागीच मृत्यु झाला.

तर यात ऑटो चालक संजय अशोक पवार हा गंभीर जखमी झाला असुन त्यास पुसद येथे पुढील उपचारा करिता पाठवण्यात आले तर शेख अहेमद शेख कमाल व विलास वासुरकर यांना तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. हा अपघात ज्या दुचाकीमुळे झाला तो दुचाकी चालक धुम स्टाईल ने पळुन जाण्यास यशस्वी झाला आहे. बातमी लिहेपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

या अपघाताला मुळ कारणीभुत परिवहन विभाग असुन ते केवळ महिण्यातुन एका दिवासचे कॅंप लावुन आपले धागे दोरे टिपुन जात असल्यामुळे किनवट शहरात वाहतुक नियमांचा बोजवारा उडाला आहे, तेलंगाणा राज्यातुन फायनान्स बुडवुन विना कागदपत्रांच्या चोरीच्या अशा पिवळ्या रंगाच्या ऑटो कसहीली परिवहन विभागाची परवानगी नसतांना राजरोसपणे धावतांना निदर्शनास येतात. यामध्ये असलेला चालक हा या प्रशिक्षित व परवानाधारक नसतो त्यामुळे वाहतुकीचे नियम त्यास काहीच माहित नसतात त्यामुळे वाहन चालवताना कुठे थांबवावे ? रस्ता बदलतांना काय खबरदारी बाळगावी, वाहनातुन कोणते स्गिग्नल निघाले पाहिजे.


या अशा अनेक बाबी व नियामांची या अप्रशिक्षित वाहन चालकाला माहीती व ज्ञान नसल्याने वाहतुक नियमांचा नुसता बोजवारा उडालेला आहे. वाहनाचाची फिटनेस, त्याचे प्रदुषण चाचणी व परवाना ह्या बाबी तपासण्याची तसदी कोणत्याही परिवहन विभागातील अधिकारी अथवा वाहतुक पोलिसांनी घेतली नसल्याने अशा प्रकारचे बेकायदेशिर जिवघेणी वाहतुक किनवट, गोकुंदा सह परिसरातील ग्रामिण भागाकरिता राजरोसपणे चालु आहे. तरी सदरील पिवळ्या रंगाचे अनधिकृत ऑटो जप्ती करण्याची मोहीम राबवावी व वाहनाचे मुळ मालक स्वतः जोपर्यंत येणार नाही तो पर्यंत वाहन इतरांच्या ताब्यात देऊ नये व वाहन सोडु नये यामुळे चोरीचे कोणते व मालकी कोणते हे निदर्शनास येईल.