car and a two-wheeler : आटो व दुचाकी वाहनांच्या जबर धडकेत आटोतील व्यक्तीचा मृत्यू
किनवट, परमेश्वर पेशवे| शहरातुन पैनगंगा अभयारण्यकडे जाणा-या मार्गावर मार्गावर बुधवार दि.२२ रोजी सकाळी दुचाकी व प्रवासी वाहतुक करणा-या ऑटो यांच्यात झालेल्या अपघातात एक सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी साहेबराव गंगाराम बटुर यांचा जागीच मृत्यु (car and a two-wheeler accident) झाला तर तीघे गंभीर जखमी झाले आहे.
गोकुंदा ते किनवट असा प्रवास करत असलेला ऑटो व एक दुचाकी ज्याचा चालक शेख अहेमद शेख कमाल खान रा. किनवट हे सुरळीत प्रवास करत असतांना एका धुम स्टाईल दुचाकी चालवणा-या बजाज पल्सर या कंपनीच्या अज्ञात दुचाकी चालकाने दोघांना सुसाट वेगात कट मारल्याने ऑटोचाकल व शेख अहेमद या दुचाकी चालकांचा त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटोने दुचाकी चालकास जोरदार धडक मारली यात सदर ऑटो पलटी झाला ऑटो मधील प्रवासी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव बटुर यांचा जागीच मृत्यु झाला.
तर यात ऑटो चालक संजय अशोक...
