नांदेड| राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण,तथा “पंतप्रधान टी.बी.मुक्त भारत अभियान” या, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांक्षी योजना आंतर्गत पोलिओ सारख्या, अत्यंत संसर्गजन्य तथा जीव घेण्या अशा “क्षय” या रोगाचे, 2025 पर्यंत भारतातून उच्चाटण करावयाचे ध्येय आहे.
त्यानुसार केंद्रशासन व राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका तथा शहर क्षयरोग अधिकारी कार्यालय नांदेडच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्वरित रोगनिदान आणि योग्य रोगोपचारा बरोबरच प्रतिबं धात्मक उपाय म्हणून टी.बी विरूद्ध लढाई जिंकण्यासाठी आठरा वर्षावरील सर्व प्रौढ नागरिकांसाठी बी.सी.जी.च्या लसीकरण मोहिमे अंतर्गत शिबिर घेण्यात येत आहे.
त्या अनुसंघाने फेस्काॅम उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागगरिक संघ समन्वय समिती आणि नांदेड वाघाळा शहर आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “खास ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामुल्य(मुफत)” बी.सी.जी लसीकरण शिबीर वैद्य रूग्णालयात दि.27/11/24 रोजी सकाळी साडे आकरा ते संद्याकाळी साडे चार वाजे पर्यंत घेण्यात येत आहे.येताना आधार कार्ड व ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र आनणें अवश्यक आहे.
तेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ महिला पुरूष्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य(अध्यक्ष),प्रभाकर कुंटूरकर(सचिव),गिरिष बार्हाळे(कोषाध्यक्ष),डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार (महिला प्रमुख), सौ.निर्मला बार्हाळे, माधवराव पवार काटकळंबेकर, श्रीमती प्रभा चौधरी, प्रा.डाॅ.अंजली चौधरी आदिनी केले आहे.