नवीन नांदेड l सिडको येथील महाराणा प्रतापसिंह महाराज स्मारक सुशोभीकरण साठी पाच लाखांचा निधीची घोषणा नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी केली.

महाराणा प्रतापसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील स्मारक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, ऊमरकेर ,रवि थोरात , पप्पू गायकवाड,कछवे,यांनी सिडको येथील महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी आ.बोढारकर यांनी पाच लाख रुपये सुशोभीकरण साठी घोषणा केली,या घोषणांचे स्वागत राजपूत समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात केले.यावेळी आ.बोढारकर व उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत संयोजक गजानन चंदेल यांनी केले.



