नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या अनेक चार ते पाच महिन्यांपासून व झालेल्या संततधार पावसामुळे व वारा वादळ यामुळे परिसरातील स्ट्रीट लाईट व रस्त्यावरील लाईट बंद असल्याने अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले असून या बाबत आयुक्त व विद्युत विभाग यांच्याशी संपर्क साधून व निवेदनाद्वारे मागणी करूनही चालू होत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी दिला आहे.


मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट अनुक्रमे दुध डेअरी ते ढवळे व गोविंद गार्डन या मार्गावर व सिडको हडको परिसरा अंतर्गत मुख्य व अंतर्गत रस्त्यावर स्ट्रीट लाईट व मर्क्युरी लाईट बंद अवस्थेत असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे व वारं वादळ सुटल्याने आहे ते स्ट्रीट लाईट व टुयब लाईट बंद असल्याने या बाबत मनपा आयुक्त व विद्युत विभाग यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून ही चालु न झाल्याने तात्काळ परिसरातील स्ट्रीट लाईट व मर्क्युरी लाईट चालू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांना दिला आहे.
