उस्माननगर,माणिक भिसे | नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी शुक्रवारी उस्मान नगर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले व यावेळी विविध कार्यक्रमाला संबोधित केले.


पोलीस विभागातर्फे दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वार्षिक तपासणी करण्यात येते यावर्षी नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस व महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 22 मार्च शुक्रवारी उस्मान नगर पोलीस ठाण्याची तपासणी करून केलेल्या कामाचे यावेळी त्यांनी कौतुक केले आहे. उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलिस पाटील, माजी सरपंच लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संवाद साधताना गावातील समस्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पोलिस मैदानात फळांचे व इतर जातींच्या वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले.पोलिस ठाणे उस्माननगर सुशोभीकरण व आमराई उद्घाटन करण्यात आले.


उस्माननगर पोलिस स्टेशनचे वार्षिक तपासणी करण्यासाठी आलेले पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संवाद साधताना म्हणाले की,काही प्रकरणे सुरवातीला लहान स्वरूपात असतात परंतु त्याचेच रुपांतर गंभीर गुन्ह्यांत होते. त्याकडे दुर्लक्ष न करता स्थानिक पातळीवरील प्रकरणे चिघळण्या पुर्वीच पोलीसांना कळवावे. समाजात सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विषेश पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. दि.२२ मार्च रोजी उस्माननगर पोलीस स्टेशन च्या वार्षिक निरिक्षण आढावा बैठक व महाराष्ट्र शासन शंभर दिवसांचा कृति आराखडा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.


व्यासपीठावर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,डी वाय एस पी.पोपळघाट, कंधार लोह्याच्या पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ . अश्विनी जगताप,स.पो.नी. चंद्रकांत पवार उपस्थित होते.पुढे बोलताना उमाप म्हणाले , समाजातील ज्येष्ठ मंडळींनी तरुणांचे प्रबोधन करावे , गुन्हेगारी क्षेत्रात दाखल होण्यापासून वेळीच सावधगीरी बाळगावी . आणि गुन्हे दाखल झाल्यामुळे तरुणांचे भविष्यात अडचणी निर्माण होतात . प्रसंगी भविष्य अंधारात जाते .त्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी तरुणांना मार्गदर्शन करावे असे म्हणाले. यावेळी शहाजी उमाप यांनी नागरिकांशी संवाद साधुन परिसरातील समस्या जाणून घेतल्या . यामध्ये पोलिस पाटील यांनी परिसरात अवैध मार्गाने विकणारी दारू विक्री कडे लक्ष द्यावे अशी विनंती केली.


तसेच उस्माननगर परिसरात सार्वजनिक ठीकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे विनापरवानगी झेंडे व विशीष्ठ जाती धर्माचा उल्लेख असलेले बोर्ड लावण्यात येत आहेत. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असा संवाद भाजपाचे तुकाराम वारकड गुरुजी यांनी केला. कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख असलेले बोर्ड परिसरात लावु नये आपल्या परिसराला महापुरुषांची नावे द्यावीत असा शासननिर्णय आहे. परंतु संमंधीताकडुन त्याकडे दुर्लक्ष केले जाते.रोपटे देउन सपोनि पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता, स्वच्छता संदेशाची लावलेली बॅनर उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होती. पोलिस ग्रांउडमधे लावलेल्या अमराईचे व कोनशिलेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला आनंदराव लाटकर,माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, वारकड गुरुजी, सरपंच खुशाल पांडागळे, उस्माननगर चे सरपंच काळम , पोलीस पाटील विश्वाभर मोरे,साईनाथ कापाळे, परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष , महिला सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूर्यकांत मालीपाटिल यांनी केले.प्रास्ताविक व आभार सपोनि . चंद्रकांत पवार यांनी केले.


