नांदेड| नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे आधिकृत उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक ९ नोव्हेंबर रोजी कौठा नांदेड येथील मोदी मैदानावर जागतिक कीर्तीचे नेते , भारताचे कणखर नेतृत्व लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मा नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य सभा मंडपाचे भूमिपूजन आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी विधिवत करण्यात आले.
खा. डॉ. अजित गोपछडे , लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे , नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.बालाजीराव कल्याणकर , दक्षिण नांदेडचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव बोंढारकर , भाजपाच माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख , बाळू खोमणे , देविदास राठोड, डॉ. माधवराव पाटील उच्चेकर , उद्धवराव पाटील शिंदे , धनराज शिरोळे, अजयसिंह बिसेन, विजय गंभीरे , दीपकसिंह रावत , शंकर मनानकर , अभिषेक सौदे , हरभजन सिंग पुजारी , अशोक पाटील धनेगावकर , बजरंग ठाकूर , संदीप कराळे ,शांभवी प्रवीण साले,आशीष नेरळकर,सुनील भालेराव, सुनील पाटील , व्यंकटराव मोकले , गुरुदीपसिंग रजसिंग पुजारी, तुळजाराम यादव बागडे आदींची उपस्थिती होती.
जाहीर सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , पालकमंत्री गिरीश महाजन , माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.