सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 असा आहे. 87-नांदेड दक्षिण व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8237960955 असा आहे. तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 7385842084 असा आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.
निवडणूक निरीक्षक कालु राम रावत
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे दाखल झाले आहेत. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे.
मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर व दक्षिणसाठी निरीक्षक
आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक विधानसभा मतदारसंघासाठी 8483845220 हा आहे.
ए गोविंदराज लोहा, नायगाव, देगलूर, मुखेडसाठी खर्च निरीक्षक
तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी मृणालकुमार दास
लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मृणालकुमार दास आयआरएस यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8626095922 असा आहे. या भ्रमणध्वनी क्रमांकावर काही तक्रार किंवा माहिती द्यायची असेल तर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.