HomeनांदेडHanuman Temple ; दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने विविध...

Hanuman Temple ; दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

नवीन नांदेड l दक्षिण मुखी हनुमान मंदिर सिडको चा तिसरा वर्धापनदिन निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्री बागेशवर धाम सेवा समिती यांच्या वतीने भव्य महा आरती व हनुमान चालीसा पठणचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन संध्या कार्यक्रमास भाविक भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला , महाआरती महाप्रसाद आयोजनास भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

सिडको शिवमंदिर समोर असलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे दि 23 मार्च रोजी तिसऱ्या वर्धापनदिन निमित्त सकाळी सतीश गुरू यांच्या अधिपत्याखाली विश्वस्त भगवान नवघरे पाटील यांच्या हस्ते अभिषेक आरती व संध्याकाळी श्री .बागेश्वर भजनी मंडळ नांदेड यांच्या वतीने भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जयश्री राम ,हनुमान भगवान यांच्या वर आधारित अनेक गाजलेली भजन गिते सादर करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात उपस्थितीत भाविक भक्तांनी श्रीराम व हनुमान यांच्या जयकाराने दुमदुमला होता,डॉ.नरेश रायेवार, पिंटू महाराज ,सतिश गुरू, प्रसन्ना उतरवार, भगवानराव नवघरे पाटील यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विश्वनाथ भगवान नवघरे पाटील,जीवन पानपटे ,संतोष थडवे,करंमजीत सिंग बेदी, गणेश पंडागळे,सतीश गुरू,यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments