Hanuman Temple ; दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
नवीन नांदेड l दक्षिण मुखी हनुमान मंदिर सिडको चा तिसरा वर्धापनदिन निमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्री बागेशवर धाम सेवा समिती यांच्या वतीने भव्य महा आरती व हनुमान चालीसा पठणचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन संध्या कार्यक्रमास भाविक भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला , महाआरती महाप्रसाद आयोजनास भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
सिडको शिवमंदिर समोर असलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे दि 23 मार्च रोजी तिसऱ्या वर्धापनदिन निमित्त सकाळी सतीश गुरू यांच्या अधिपत्याखाली विश्वस्त भगवान नवघरे पाटील यांच्या हस्ते अभिषेक आरती व संध्याकाळी श्री .बागेश्वर भजनी मंडळ नांदेड यांच्या वतीने भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जयश्री राम ,हनुमान भगवान यांच्या वर आधारित अनेक गाजलेली भजन गिते सादर करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात उपस्थितीत भाविक भक्तांनी श्रीराम व हन...
