उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उस्माननगर येथील ग्रामपंचायत येथे अनेक वर्षांपासून वास्तव करून बसलेल्या महीला ग्रामविकास अधिकारी सौ. डि.ए. शिंदे – माने यांच्या कार्यकाळातील केलेल्या भ्रष्टाचारी कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी ईसादकर यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
उस्माननगर येथे मागील अनेक वर्षांपासून गावात वेळेवर नाली सफाई नाही , सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे . जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधी येत आहे. शासन यावर लाखो रुपये खर्च करीत असते पण येथे मात्र स्वच्छतेला निधी उपलब्ध नसल्याचे सांगून आलेला निधी जातो कुठे की ? उस्माननगर ता.कंधार येथील गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सौ .डि . ए. शिंदे – माने या ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचे कामे त्यांचे गुत्तेदार पती ( मिस्टर ) माने हे १५ ( पंधरा) वित्त आयोगाच्या व शासनाच्या ईतर निधीचे कामे त्यांचे गुत्तेदार पती करत असतात. गेल्या पाच सहा वर्षांपासून शासनाची व गावाला लुटून कोट्यवधी रुपयांची निधी हाडफ करण्यात धन्यता मानली आहे.
गावातील मुलभूत सोयी सुविधांकडे लक्ष न देता गावातील लोकांच्या समस्या कडे दुर्लक्ष करून पूर्ण गाव संबंधित अधिकारी यांच्या विरोधात वेळप्रसंगी वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार ( महेश पाटील ) यांना वारंवार तक्रार करूनही कानाडोळा व वेळकाढूपणा करून ते पण जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत . भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्याना सपोट पाठिंबा दिसून येत आहे . ग्रामसेविका मॅडमची दोन वेळेस बदलीचे आदेश देण्यात आले होते . दि. १९ / ४/ २०२३ मध्ये , जा. क्र. ८६७ व त्यानंतर दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी जा. क्रं. २९८२ दोन वेळेस बदली होऊन त्या गाव सोडायला तयार नव्हत्या. फेमिकाॅल होऊन खुर्चीवर आज पर्येत चिटकवून राहिल्या .
येथे येणाऱ्या दुसऱ्या ग्रामसेवकाला धमकावत आहेत. उस्माननगर येथे कोट्यवधींचा निधी हाडपून त्यांचे गुत्तेदार पती देव यांनी विविध ठिकाणी ( लोणावळा , नांदेड व इतर ठिकाणी ) प्लाट ,घर , व इत्यादी संपत्ती भ्रष्टाचाराच्या रक्कमेतून घेतले आहेत . दोघांच्याही बॅक खात्यातील ॲकाऊट निहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे , अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल . सात दिवसांत कार्यवाही झाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा शेकापचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी ईसादकर यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.