धार्मिकनांदेड

Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे |आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर संपूर्णं महाराष्ट्रातील भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये,या हेतुने शिवसेना-युवासेनेच्या (उबाठा) वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणार्‍या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला पहिल्या माळीपासून सुरुवात.

IMG 20241003 WA0083 Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा - शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप - NNL

माहूरगडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास दि.३ आॅक्टोला सुरुवात झाली आहे. हा नवराञ उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात संपूर्णं महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक श्री रेणूकामातेच्या दर्शनाकरिता माहुरगडावर येतात आशा वेळी दुरुन येणार्‍या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने व हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरना प्रमाणे २० टक्के राजकारण व ८० टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धरुण युवासेना, शिवसेनाच्या (उबाठा ) वतीने व युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.यश खराटे यांच्या नेतृत्वाखाली दररोज येणार्‍या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.आज पासून सुरु झालेल्या नवराञ उत्सवाच्या पहिल्या दिवसीच्या फळे वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी किनवट-माहूर विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे, शिवसेना  उप.जिल्हाप्रमुख अनिल रूणवाल, जवाहरलाल  जयस्वाल,युवासेना जिल्हा समनवय नितीन पाटील कन्नलवार, माहूर नगरपंचायत उपाध्यक्ष नाना लाड, नगरसेवक विजय कामटकर, शहर प्रमुख निरधारी जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितु चोले, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख,युवतीसेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर आशिष जयस्वाल,अभिषेक जयस्वाल, अभिषेक दुबे,रुपेश कोवे,बाळु दवणे, आशिर्वाद आडावे, अक्षय जांभळे, गजानन चोपडे.यांची उपस्थिती होती.

IMG 20241003 WA0082 Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा - शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप - NNL

नवरात्रीच्या पावन उत्सवात अनेक भागातून भाविक आई रेणुकामातेच्या दर्शनासाठी येत असतात.अशा वेळी त्यांची गैर सोय होऊ नये हा आमचा मानस आहे.येणार्‍या भाविकांची मनोभावे सेवा करून आपण यातूनच ईश्वरसेवा साधत असल्याचे प्रतिपादन यावेळी अॅड.यश खराटे यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!